

Saiyaara Box Office 1st day Collection
मुंबई - अहान पांडेचा रोमँटिक चित्रपट 'सैयारा'ने पहिल्या दिवशी रेकॉर्डतोड कमाई केली आहे. कोटींच्या प्री-बुकिंगवरूनच अंदाज लावला जात होता की, हा चित्रपट रेकॉर्ड ब्रेक करेल. चित्रपटाने अक्षय कुमार, आमिर खान, सनी देओल सर्वांना मागे टाकले आहे. अहान पांडे आणि अनीत पड्डा स्टारर डेब्यू चित्रपट 'सैयारा'ने १८ जुलै रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. मोहित सूरी यांचे दिग्दर्शन असलेल्य नव्या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कोटींचा गल्ला जमवला पाहुया.
अहान पांडेचा अभिनेता म्हणून ‘सैयारा’ हा पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा डेब्यू चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने पहिल्या शुक्रवार २० कोटी रुपयांचे कलेक्शन केलं आहे. एखाद्या नव्या अभिनेत्यासाठी ही चांगली सुरुवात आहे. चित्रपट समीक्षकांकडूनही याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अहान पांडेची बहिण अनन्या पांडेचा डेब्यू चित्रपट 'स्टुडेंट ऑफ द ईयर २' ने पहिल्या दिवशी १२.०६ कोटी रुपये कमावले होते. जान्हवी कपूरच्या 'धडक'ने ८.७१ कोटी रुपये, खुशी कपूरच्या 'लवयापा'ने १.१५ कोटी, राशा थडानीच्या 'आजाद'ने १.५ कोटी आणि शनाया कपूरच्या 'आंखों की गुस्ताखियां'ने पहिल्या दिवशी ३० लाख रुपयांचे कलेक्शन केलं होतं.
सैयाराचं बजेट ४५ कोटींचं म्हटलं जात आहे. सोबतच 'निकिता रॉय' आणि 'तन्वी द ग्रेट' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आहेत. 'सैयारा' थिएटरमध्ये रिलीजनंतर नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होईल. पण अद्याप ओटीटी रिलीज डेटची घोषणा झालेली नाही.
अनन्या पांडेचा चुलत भाऊ अहानची दमदार कामगिरी पाहत बहिण अनन्या पांडे भावूक झाली. तिने इन्स्टावर काही फोटो शेअर केले आहेत, जे बालपणातील आहेत. सैयारा चित्रपटगृहात येत आहे. ती म्हणाली- ''मला विश्वास बसत नाहीये की, माझ्या छोट्या भावाचा पहिला चित्रपट रिलीज होत आहे. चित्रपटात तुझं स्वागत आहे अहान. तू सर्वात प्रेमळ आहेस.''