

sangeeta bijlani theft at maval farmhouse
मुंबई - हिंदी चित्रपट अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या पवना धरणाच्या बँक वॉटरला असलेल्या तिकोना पेठ येथील फार्म हाऊसमध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये चोरट्यांनी रोख रक्कम आणि टीव्ही असा ऐवज लंपास केला आहे. ५० हजार रुपयांची रोख रक्कम आणि ७ हजार रुपये किंमतीचा टीव्ही चोरला आहे. या घटनेबाबत मोहम्मद अझहरउद्दीन यांचे पीए मोहम्मद मुजीब खान यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मोहम्मद अजहरउद्दीन यांची पत्नी व अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या मालकीचा तो फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसच्या पाठीमागून चोरट्यांनी प्रवेश करत ग्रील उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरी करून नेला. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे पुढील तपास करत आहेत.
रिपोर्टनुसार, संगीता बिजलानीने पुणे रूरल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. एसपी संदीप गिल यांनी सांगितले कीस संगीता बिजलानी मागील चार महिन्यांपासून आपल्या फार्महाऊसवर गेली नव्हती. आपल्या तक्रारीत संगीताने सांगितलं की, ती ४ महिन्यांनंतर १८ जुलै रोजी रात्री साडे अकरा वाजता आपल्या फार्महाऊसवर पोहोचली होती.
संगीता दोन स्टाफ मेंबर्ससोबत तिथे गेली होती. तिथे संगीताने पाहिलं की, फार्महाऊसची मेन एन्ट्रेंस तोडण्यात आलं होतं. तिने आत जाऊन पाहिलं होत, फार्महाऊसचं खूप नुकसान झालं होतं आणि घरातून अनेक वस्तू गायब झाल्या होत्या.