मनोरंजन

Happy Birthday Madhuri Dixit : वडिलांची इच्छा होती, ‘माधुरीने डॉक्टर व्हावं’, पण ती कशी बनली ‘धकधक गर्ल’

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : माधुरी दीक्षितने बॉलीवूडमध्ये अनेक वर्षांपासून आपले वलय निर्माण केले आहे. ही बॉलीवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात १९८४ मध्ये रिलीज झालेला चित्रपट 'अबोध'मधून केलं होतं. या चित्रपटामध्ये तिने गौरीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक हिरेन नाग होते. या चित्रपटामध्ये तिने तापस पाल, शीला डेविड, दिनेश हिंगू, लीला मिश्रा, अशोक सराफ, विनोद शर्मा यांच्यासोबत काम केलं होतं. चित्रपटामध्ये एक मॉडर्न मुलगी असो वा पारंपरिक तरुणीची भूमिका, त्याचबरोबर देवदासमध्ये तिचा चंद्रमुखीची भूमिका एक वेगळी भूमिका होती. साऊथ डान्सर प्रभुदेवा आणि ऋतिक रोशन देखील माधुरीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मानतात. तुम्हाला माहितीये का, माधुरीने डॉक्टर व्हावं, अशी त्यांची इच्छा होती. पण, माधुरी अभिनेत्री झाली. एका मध्यमवर्गीय कुटूंबातून आलेली माधुरी धकधक गर्ल कशी बनली? जाणून घेऊया.

माधुरीचे आई-वडील
माधुरीचे आई-वडील

माधुरीविषयी या पाच गोष्टी जाणून घ्या

  • माधुरी दीक्षितचा जन्म १५ मे, १९६७ रोजी मुंबईत झाला
  • तिने आपले शालेय शिक्षण डिव्हाईन चाइल्ड हायस्कूल, मुंबई येथून पूर्ण केले
  • तिने मुंबईच्या पार्ले कॉलेजमधून मायक्रोबायोलॉजीमध्ये पदवी मिळवली
  • तिच्या वडिलांचे नाव लेफ्टनंट शंकर दीक्षित आहे. तिच्या आईचे नाव स्नेह लता दीक्षित आहे
  • माधुरीचे लग्न डॉ. श्रीराम नेने यांच्याशी झाले आहे. दोघांना रायन आणि अरिन अशी दोन मुले आहेत

हम आपके है कौन, दिल तो पागल है, तेजाब, देवदास आणि अन्य अनेक चित्रपट क्लासिक ठरले आहेत. 'हम आपके है कौन' मध्ये माधुरीची अभिनय, भावमुद्रा आणि डान्समध्ये सलमान खान पेक्षा अधिक चर्चा झाली होती. अनेक वर्षांनंतर आजदेखील लोक तिला 'दीदी तेरा देवर दीवाना', 'एक दो तीन', 'धक धक करने लगा', डोला रे डोला', 'हमको आजकल है इंतजार' गाण्यासाठी आठवण करतात.

माधुरी समवेत दोन्ही बहिणी रूपा आणि भारती. सोबत आई.

दोन्ही बहिणींनी दिलं प्रोत्साहन

माधुरीच्या आई-वडिलांची इच्छा होती की, तिने डॉक्टर व्हावं. पण, माधुरी अभिनय क्षेत्रातून पुढे आली. माधुरीला दोन बहिणी आहेत- रूपा आणि भारती. माधुरी प्रमाणेच दोघीही ट्रेंड कथ्थक डान्सर आहेत. माधुरीची बहिण लाईमलाईटपासून दूर राहते. पण दोन्ही बहिणींनी माधुरीला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं.

अजित दीक्षित

भावानेच माधुरीला डॉ. नेनेंशी भेटवण्याचा केला होता प्लॅन

माधुरीचा भाऊ अजित दीक्षितने तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांची पहिली भेट घडवून आणली होती. अजितने डॉ. नेनेंच्या परिवाराला गुपचुपपणे एका पार्टीत बोलावलं होतं. येथेय माधुरी आणि डॉ. नेने यांची भेट झाली होती, खुलासा एका मुलाखतीत माधुरीने केला होता.

हेदेखील वाचा –

SCROLL FOR NEXT