Happy Birthday Jr. NTR 6 pack abs journey Instagram
मनोरंजन

Happy Birthday Jr. NTR | ९४ कि. वजनाच्या ज्यु. एनटीआरने स्वत:मध्ये केला इतका बदल, कधी काळी बसला होता कुरूप असण्याचा शिक्का

Happy Birthday Jr. NTR 6 pack abs journey | कधी काळी जाडजूड, कुरुप म्हणून हिणवला गेलेला अभिनेता ज्यु. एनटीआरने स्वत:मध्ये प्रचंड बदल घडवला आहे.

स्वालिया न. शिकलगार

Happy Birthday Jr. NTR 6 pack abs journey

मुंबई : एस. एस. राजामौली यांचा आरआरआर चित्रपट रिलीज झाला आणि धमाका झाला तो नाटू-नाटू या गाण्याचा. चित्रपटाने इतकी मोठी बाजी मारली की, चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याने २०२३ मध्ये गोल्डन ग्लोब पुरस्कारावर मोहर उमटवली. इतकचं नाही तर मुख्य नायक रामचरण आणि ज्यु. अनटीआर यांचा कसदार अभिनय, ॲक्शन्स, डान्स सर्वच प्रेक्षकांना भावलं. आज २० मे रोजी ज्यु. एनटीआरचा ४२ वा वाढदिवस आहे.

कधी काळी जाडजूड होता ज्यु. एनटीआर

कधी काळी कुरूप असण्याचा शिक्का त्याच्यावर बसला होता. पण, आज पाहिलं तर अभिनयात त्याचा हात कुणीही धरू शकणार नाही. एकेकाळी त्याचे वजन ९४ किलो होते. लोक त्याला जाडजूड आणि कुरूप म्हणून ट्रोल करत असत. पण त्याने स्वत:मध्ये इतका बदल केला की, सिक्स पॅक ॲब्जसह तो थेट पडद्यावर आला. आज फिटनेसमध्ये सर्वात फिट असणाऱ्या अनेक तेलुगु अभिनेत्यांची त्याने सुट्टी केलेली आहे.

एनटीआरने ‘लोक परलोक’, ‘RRR’ अशा चित्रपटांमध्ये फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन दाखवले आहे. ज्युनियर एनटीआर त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतो. सकाळी उठल्यापासून त्याची दिनचर्या खूप व्यस्त असते. एका चित्रपट निर्मात्याचा मुलगा असूनही तो साधेपणाने जगतो. म्हणूनचं तो मोठा स्टार असूनही त्‍याचा साधेपणा चाहत्‍यांना भावतो.

एनटीआर ज्युनियर विषयी माहितीये का?

साऊथचा ॲक्शन स्टार ज्युनियर एनटीआरचा जन्म २० मे, १९८३ रोजी हैदराबाद येथे झाला. आंध्रचे माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज अभिनेते एनटी रामारावचा नातू म्हणून त्याची ओळख आहे. ॲक्शन, डान्स आणि अभिनय या तिन्ही गोष्टींमध्ये एनटीआर ज्युनियरचा दबदबा आहे. यासाठीच त्याला 'हिटस्टार' देखील म्हटलं जातं. त्याचं खरं नाव 'तारक' असे आहे, हे खूप कमी लोकांना माहिती असेल.

कसं घडलं फिजिकल बॉडी ट्रान्सफॉर्मेशन

ज्युनियर एनटीआरने त्याच्या आजोबांनी दिग्दर्शित केलेल्‍या 'ब्रह्मर्शी विश्वामित्र'मध्ये त्याने बालकलाकार म्हणून भूमिका साकारली होती. तसेच १९९७ मध्ये वयाच्या १४ व्या वर्षी रामायणं मध्ये त्याने बालकलाकार म्हणून काम केले. २००१ मध्ये 'स्टुडंट नंबर १' या हिट चित्रपटातून त्याने अभिनेता म्हणून करिअरला सुरुवात केली होती.

२००६ मध्ये राखी चित्रपटातील त्याच्या लूकवरून लोकांनी त्याला खूप ट्रोल केले होते, कारण त्यावेळी त्याचे वजन ९४ किलो झाले होते. २००७ मध्ये त्याने लोक-परलोक चित्रपटासाठी २० किलो वजन कमी केलं होतं.२०१८ मध्ये पहिल्यांदा तो अरविंद समेता चित्रपटातून सिक्स पॅक एब्जसह पडद्यावर झळकला होता. २०२२ मध्ये सिक्स पॅक एब्ज लूकमध्ये तो आरआरआर चित्रपटामध्ये दिसला.

आता ज्यु. एनटीआर लवकरचं ऋतिक रोशन स्टारर चित्रपट ‘वॉर २’ मधून बॉलीवूड डेब्यू करणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT