बॉबी देओलने 1995 मध्ये ‘बरसात’सह बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि पटकन रोमँटिक हिरो म्हणून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. मात्र पुढील काही वर्षांत सतत फ्लॉप्समुळे करिअर मंदावले. खलनायक आणि नेगेटिव्ह रोल्समध्ये दमदार अभिनय करून बॉबीने ‘आश्रम’ आणि ‘अॅनिमल’मध्ये सुपर कमबॅक केला. आज तो अनुभवी आणि विश्वासार्ह कलाकार म्हणून पुन्हा चर्चेत आहे.
Happy Birthday Bobby Deol
आज बॉलीवूड स्टार Bobby Deol चा वाढदिवस आहे. बॉबी देओल आज ५७ वर्षांचा झाला. दिग्गज दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांचा लहान मुलगा बॉबी देओल अनेक दशकांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात अभिनेता म्हणून केली.
एक काळ असा होता की बॉबी देओल बॉलिवूडमधील टॉप हिरोंमध्ये होता, परंतु अनेक फ्लॉप चित्रपटांनंतर तो आता खलनायकी भूमिका साकारत आहे. खलनायकी भूमिका साकारूनही, बॉबी देओलला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे. या भूमिकांमुळे त्याची चांगली कमाई होत आहे.
१९९५ मध्ये ‘बरसात’ने बॉबीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि तो त्यावेळी रोमँटिक हिरो म्हणून ओळखला गेला. आकर्षक लूक, दमदार व्यक्तिमत्त्व, कुरळे लांब केस आणि दमदार डायलॉग्समुळे बॉबीने सुरूवातीला जबरदस्त लोकप्रियता मिळवली.
मात्र पुढील काही वर्षांत बॉबीच्या करिअरला आव्हानं आली. ‘अजनबी’, ‘अमानत’, ‘कूलिए’ सारख्या चित्रपट अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरले नाहीत. दुसरीरडे त्याची तुलना मोठा भाऊ सनी देओलशी होत गेली. त्याच काळात बॉलिवूडमध्ये बदलत्या ट्रेंडनुसार, वेगळ्या भूमिकांमध्ये बदल होत होता. दुसऱ्या हिरोंनी देखील एन्ट्र्री मारली. चांगला अभिनय असताना देखील त्याचे काही चित्रपट फ्लॉप ठरले. सुरुवातीला बरसातमुळे चर्चेत असलेल्या बॉबीने ठिकठाक चित्रपट दिले.
‘बरसात’नंतर बॉबी देओलने अनेक चित्रपट केले :, ज्यामध्ये ‘अजनबी’ (१९९६) बॉक्स ऑफिसवर थोडे यश मिळाले. ‘अमानत’ (१९९६) – सरासरी कमाई केली. ‘बटलग्राउंड’ (१९९७) फ्लॉप ठरला. २००० मध्ये बॉबी देओलने ‘कूलिए’ (२००१), ‘अनोखा’ (२००१), ‘प्रोफेशनल’ (२००२) यासारखे चित्रपट केले. पण काही चित्रपट हिट झाले, पण नंतर त्याचे सातत्याने चित्रपट फ्लॉप ठरले. ‘सोल्जर’ला बॉक्स ऑफिसवर थोडे यश मिळाले. ‘हॅलो ब्रदर’ हिट ठरला. पुढे बॉबी देओलने खलनायकाच्या भूमिकेतू कमबॅक केले. ‘अॅनिमल’ (२०२३) बॉबीची दमदार भूमिका पाहायला मिळाली. ‘आश्रम’ वेब सीरीजमधील त्याने उत्कृष्ट अभिनय साकारला होता. त्यानंतर ‘अॅनिमल’मधील त्याच्या अभिनयाची वाहवा झाली.
लव्ह होस्टेल, कंगुवा, क्लास ऑफ ८३, हाऊसफुल्ल ४, यमला पगला दिवाना, रेस यासारख्या असंख्य बॉलिवूडपटातून त्याने आपला अभिनय पुन्हा एकदा सिद्ध केला. आज बॉबी देओल फक्त टॉपचा हिरो नाही तर दमदार भूमिका साकारण्यातही माहिर असलेला अभिनेता म्हणून ओळखला जातो. यश- अपयश आणि मेहनतीमुळे बॉबीने सुपर कमबॅक केले आहे. आलिया भट्ट स्टारर अल्फा या चित्रपटामध्येही त्याची शानदार भूमिका असणार आहे.
बॉबी देओलची संपत्ती
मीडिया रिपोर्टनुसार, बॉबी देओलची एकूण संपत्ती अंदाजे १३० कोटी आहे आणि सध्या तो प्रत्येक चित्रपटाला ५० कोटीपर्यंत फी घेतो. बॉबी सध्या प्रती चित्रपट ४-५ कोटी कमावतो. बॉबी देओलची एकूण संपत्ती सुमारे ६८ कोटी असल्याचे म्हटले जात अंदाज आहे.