Neem Karoli Baba Web Series: भारतीय चित्रपट सृष्टीत २०२६ मध्ये कोणत्या चित्रपटाने धुमाकूळ घातला असेल तर तो चित्रपट आहे 'हनुमान अंश'. अवघ्या २ कोटी रूपयात तयार झालेल्या या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय बाजारात जवळपास ४०० कोटींचा गल्ला कमावला आहे. नीम करोली बाबा यांच्यावर आधारित या चित्रपटाचे हे अनपेक्षित यश पाहून आता त्यांच्यावर वेब सिरीज देखील येत आहे. नीम करोली बाबा यांच्यावर सोनी लीव्हवर 'नीम करोली बाबा' ही वेब सिरीज रिलीज केली जाणार असी घोषणा करण्यात आली आहे.
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने ३० सप्टेंबर रोजी नीम करोली बाबा यांच्यावरील वेब सिरीजचा पहिला प्रोमो रिलीज केला आहे. याचे शिर्षक हे नीम करोली बाबा असं ठेवण्यात आलं आहे. ही वेब सिरीज सोनी टीव्ही आणि सोनी लीव्हवर प्रदर्शित होणार आहे.
या वेब सिरीजच्या प्रोमोमध्ये आध्यात्मिक गुरू नीम करोली बाबा यांच्याशी निगडीत गोष्टींचा समावेश आहे. यावरून या वेब सिरीजची स्टोरी ही नीम करोली बाबा यांच्या चमत्कारांबाबत असण्याची शक्यता आहे.
या प्रोमोच्या व्हाईस ओव्हरमध्ये, 'ज्या व्यक्तीच्या गोष्टींनी देशाला मंत्रमुग्ध करून टाकलं आहे आता त्यांच्या आयुष्याशी निगडीत चमत्कारिक घटना समोर येणार आहेत.' असा दावा करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये नीम करोली बाबा यांची प्रसिद्ध शॉल आणि भगवान हनुमान यांचा देखीर संदर्भ आला आहे. मात्र प्रोमोमध्ये निर्मात्यांनी याची कास्ट, प्रीमियर डेट किंवा किती एपिसोड असणार हे अजून घोषित केलेलं नाही.