मनोरंजन

Hamsa Nandini: हमसा नंदिनीने केली ब्रेस्ट कॅन्सरवर मात, आनंदात परतली सेटवर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री हमसा नंदिनीला २०२१ मध्ये स्तनाचा कर्करोग झाला होता. जवळपास वर्षभर तिने या आजाराशी लढा दिला. या जीवनाच्या लढाईत अभिनेत्रीच्या धैर्याचा विजय झाला आहे. (Hamsa Nandini) ती तिच्या ३८ व्या वाढदिवशी आनंदाने सेटवर परतलीय. हमसा शूटिंगच्या सेटवर परतल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावरील तिच्या या नव्या फोटोंचे कौतुक होत आहे. (Hamsa Nandini)

एक वर्षानंतर हमसा पडद्यावर परतली

हमसा नंदिनी ही साऊथ इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. 'लोकयम' आणि 'पंथम' सारख्या चित्रपटांनी धमाल उडवून दिली होती. या अभिनेत्रीच्या प्रत्येक अभिनयाने चाहत्यांना घायाळ केले आहे. पण, आपल्या सौंदर्याचा प्रसार करणारी हमसा गेल्या एक वर्षापासून कॅमेऱ्यापासून दूर आहे. डिसेंबर २०२१ मध्ये तिने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे चाहत्यांना सांगितले की, तिला स्तनाचा कर्करोग झाला आहे. २०२२ मध्ये तिने कॅन्सरची लढाई जिंकली आहे. अभिनेत्री आता सेटवर परतली आहे.

हमसा नंदिनीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर फोटो शेअर करून चाहत्यांना परतल्याची आनंदाची बातमी दिली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले की, 'मी चित्रपटाच्या सेटवर आहे आणि मला नवीन जीवन मिळाल्यासारखे वाटते. माझा वाढदिवस सर्वोत्तम मार्गाने साजरा करत आहे. आज रात्री माझा वाढदिवस माझ्या सहकलाकारांसह आणि टीमसोबत साजरा करणार आहे. हा दिवस पुन्हा जीवंत करण्यासाठी मला बराच वेळ वाट पाहावी लागली. तुमच्या सर्वांच्या प्रेम आणि सहकार्याशिवाय हे शक्य झाले नसते. Hugs and kisses. Yay! I am back!

हमसावर चाहत्यांचे प्रेम 

हमसाच्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. अभिनेत्रीचे चाहते तिच्या पुनरागमनाबद्दल खूप उत्सुक आणि आनंदी आहेत. एका युजरने फोटोवर लिहिले की, 'क्वीन परत आली आहे.' तर दुसऱ्याने लिहिले, 'तू खूप लढली आहेस. मी तुला सलाम करतो.

हेदेखील वाचा – 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT