अभिनेता गोविंदाला सकाळी अचानक चक्कर आल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. यावेळी तो घरातच होता. डॉक्टरांनी आता त्याला डिस्चार्ज दिला आहे. त्याच्या अचानक हॉस्पिटलमध्ये भरती होण्याने त्याच्या फॅन्समध्ये चिंता वाढली होती. फॅन्स त्याच्यासाठी देवाजवळ प्रार्थनाही करू लागले. यातच गोविंदाच्या तब्येतीबाबत नवीन अपडेट आली आहे. गोविंदाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला आहे. (Latest Entertainment News)
गोविंदाने स्वत:च त्याच्या हेल्थबाबत अपडेट दिली आहे. पण या दरम्यान गोविंदाची पत्नी सुनीताला यूजर ट्रोल करत आहेत. दरवेळी केवळ एखाद्या मुलाखतीमधून खळबळजनक खुलासा करणाऱ्या सुनीताचे सध्याचे वागणे यूजरना फारसे आवडले नाही. त्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.
सुनीताला अलीकडेच मुंबई एअरपोर्टवर स्पॉट केले गेले. यावेळी सुनीता यांनी पापाराझ्झीशी धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत विचारणा केली. त्यावेळी त्या म्हणल्या, ‘ हो मी पाहिले. माझे पती गोविंदा काल जाऊन आले. मी मुंबईमध्ये नव्हते. ते आमच्या सगळ्यांचे आवडते अभिनेते आहेत. मी देवीला कालपासून प्रार्थना करत होते की ते लवकर बरे व्हावेत. मी आता आले आहे तर लवकरच जाऊन येईन. ते बारे होतील. पंजाबी लोक कधी हार मानत नाहीत.’ यावेळी धर्मेंद्र यांच्याबाबत इतके बोलणाऱ्या सुनीता यांनी गोविंदाच्या तब्येतीबाबत एकही शब्द न काढणे यूजरना खटकले. यानंतर त्यांनी सुनीताला ट्रोल करायला सुरुवात केली.
कमेंट बॉक्समध्ये अनेकजण सुनीता यांना 'तुमचा नवराही आजारी आहे माहिती आहे ना?’ अशी कमेंट केली आहे. तर एकाने 'स्वत:च्या नवऱ्याला चक्कर आलेली हे तिला माहितीच नाही वाटते.’ अशी कमेंट केली आहे. एकजण म्हणतो, ‘आता तुम्ही इथे काय करत आहात? तुम्ही तर गोविंदासोबत असायला हवे होते.’
गोविंदा यांनी सांगितले की थकव्यामुळे त्यांची तब्येत बिघडली आहे. ज्यादा जीम केल्याने असे झाले असावे असे डॉक्टरांनी सांगितले आहे. गोविंदा यांनी अलीकडेच धर्मेंद्र यांची भेट घेतली होती.