Golmaal 5 cast updates instagram
मनोरंजन

Golmaal 5 मध्ये मोठा ट्विस्ट! करीना कपूर-सारा अली खान एकाच चित्रपटात? रोहित शेट्टीने दिलं हिंट?

Golmaal 5 Cast - रोहित शेट्टीने दिलं हिंट? करीना कपूर-सारा अली खान एकाच चित्रपटात. या अभिनेत्याची भूमिकाच बदलली

स्वालिया न. शिकलगार

गोलमाल मालिकेचा पाचवा भाग Golmaal 5 लवकरच येणार आहे आणि रोहित शेट्टीने कास्टबद्दल हिंट दिली आहे. करीना कपूर खान आणि सारा अली खान एकाच चित्रपटात दिसू शकतात, ज्यामुळे हा सिक्वेल पूर्वीसारखाच धमाल आणि मजेशीर होईल. याशिवाय, यंदा कुणाल खेमू पारंपरिक अभिनय भूमिकेऐवजी क्रिएटिव्ह कन्सल्टंट म्हणून काम करताना दिसू शकतो. 

Golmaal 5 Cast final till december

बॉलीवूडची सुपरसिक्वेल कॉमेडी फ्रँचायझी Golmaal आता पाचव्या भागासाठी तयारी करत आहे. चित्रपटाच्या पहिल्या चार भागांनी बॉक्स ऑफिसवर यश मिळवलं आहे, त्यामुळे Golmaal 5 ची नवी कथा काय असणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

रोहित शेट्टीचा चित्रपट 'गोलमाल ५' बद्दल लेटेस्ट अपडेट आलीय. खास बाब म्हणजे, करीना कपूर आणि सारा अली खान यांच्या या चित्रपटात भूमिका असणार आहे. रोहित शेट्टीने याच्याशी संबंधित पोस्टला लाईक करून हिंट दिली आहे.

रोहित शेट्टीचा चित्रपट 'गोलमाल ५'ची दीर्घकाळ चर्चा होत होती. चित्रपटाच्या कास्टबद्दल फॅन्स प्रश्न उपस्थित करत होते. रोहित शेट्टीने पुष्टी केली आहे की, करीना कपूर - सारा अली खान यांना या चित्रपटात काम करण्यासाठी संपर्क केला आहे. कुणाल खेमू चित्रपटाचा क्रिएटिव कंसल्टेंट आहे. यावर्षी एका इन्स्टाग्राम पोस्टवर रोहित शेट्टीच्या कॉमेंटने सर्वांचे लक्ष वेधले.

रोहित शेट्टीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट 'लाईक' केलं, ज्यामध्ये लिहिलं होतं, 'दिग्शर्शक रोहित शेट्टी आपल्या ब्लॉकबस्टर कॉमेडी फ्रेंचायजी गोलमाल ५ साठी तयारी करत आहेत आणि कास्टिंग विषयी आधीपासून खूप चर्चा होत आहे.

सूत्रांनुसार, रोहितने करीना कपूर, सारा अली खान यांना भूमिकेसाठी ॲप्रोच केले आहे.' सूत्रांनुसार, रोहितला सारा अली खानसोबत काम करायला खूप आवडते आणि तो तिला करिनासोबत फ्रँचायझीमध्ये परत आणण्यास उत्सुक आहे. विशेष म्हणजे, गोलमाल ५ हा चित्रपट त्याच्या मागील भागांपेक्षा अधिक मनोरंजक असेल."

रोहित शेट्टी नवीन लेखकांसोबत काम करत असल्याचेही म्हटले आहे. एनर्जेटिक कथेसाठी तो लेखकांसोबत कथेवर काम करत आहे. तगडे कलाकार आणि नवीन कल्पना घेऊऩ 'गोलमाल ५' सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असेल."

मीडिया रिपोर्टनुसार, करीना कपूर आधीच अजय देवगणसोबत या फ्रँचायझीचा भाग बनली आहे. आता दिग्दर्शक अभिषेक पाठकना पहिल्या दोन भागांइतकीच एनर्जेटिक दमदार कथा हवी आहे. चित्रपटाची टीम डिसेंबरपर्यंत गोव्यात शूटिंग सुरू करण्याचे योजना करत आहेत. ते मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होईल, अशी शक्यता वर्तवली आहे. "गोलमाल रिटर्न्स" (२००८) आणि "गोलमाल ३" (२०१०) मध्ये करीना-अजय यांची अफलातून केमिस्ट्री पाहायला मिळालीय. आता ते पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसतील. डिसेंबरच्या अखेरीस चित्रपटातील कलाकार फायनल केले जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT