मनोरंजन

gairi movie : माणसांच्या मूलभूत गरज मांडणारा ‘गैरी’ १६ डिसेंबरला भेटीला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण त्या गरजा माणूस जिवंत असेल तर आहेत… माणूस जिवंतच नसेल तर? त्याला कोणती गरज भासेल…? याचा विचार करायला लावणारा चित्रपट म्हणजे गैरी. अभिनेता मयुरेश पेम आणि अभिनेत्री नम्रता गायकवाड या नव्या जोडीची केमिस्ट्री "गैरी" या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दमदार स्टारकास्ट असलेला हा चित्रपट येत्या १६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.

युक्ता प्रॉडक्शन्स आणि द्विजराज फिल्म्सचे निर्माते प्रवीण बालाप्रसादजी बियाणी, दत्तात्रय जाधव यांची निर्मिती असलेल्या "गैरी" या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन पांडुरंग बाबुराव जाधव यांनी केलं आहे. मयूरेश पेम, नम्रता गायकवाड, प्रणव रावराणे, आनंद इंगळे, केतन पवार, समीर खांडेकर, सुनील देव, कृतिका गायकवाड, देविका दफ्तरदार यांच्या चित्रपटांत भूमिका आहेत. गुरु ठाकूर आणि विष्णु थोरे यांनी गीत लेखन, अमितराज यांनी संगीत दिग्दर्शन, फुलवा खामकर यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. वैशाली सामंत, अमितराज, मधुरा कुंभार, हृषिकेश शेलार यांनी गाणी गायली आहेत. तर पार्श्व संगीत आणि संगीत मयूरेश केळकर यांचं आहे. विनोद पाटील यांचं छायालेखन आहे.

स्वतःच्या समाजाला वाचवण्यासाठी डॉक्टर होऊ पाहणाऱ्या तरुणाला येणाऱ्या समस्या "गैरी" हा चित्रपट मांडतो. सकस कथा, दमदार स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाविषयी आता उत्सुकता निर्माण झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT