What’s New on OTT This Friday: ओटीटी प्रेमींसाठी प्रत्येक शुक्रवार खास असतो. कारण दर शुक्रवारी विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर नव्या फिल्म्स आणि वेब सीरिज प्रदर्शित होत असतात. या शुक्रवारी 19 डिसेंबर रोजी ओटीटीवर धमाका होणार आहे. क्राइम थ्रिलर, सस्पेन्स, ड्रामा, सायकोलॉजिकल थ्रिलर आणि रोमँटिक कॉमेडी अशा विविध प्रकारच्या फिल्म्स आणि सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. चला तर पाहूया, या शुक्रवारी ओटीटीवर काय-काय रिलीज होत आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकी, राधिका आपटे आणि चित्रांगदा सिंह यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही एक थरारक क्राइम थ्रिलर फिल्म आहे. कानपूरमधील एका श्रीमंत बंसल कुटुंबाच्या भीषण सामूहिक हत्याकांडाची चौकशी करणाऱ्या इन्स्पेक्टर जतिल यादवभोवती ही कथा फिरते. तपास जसजसा पुढे सरकतो, तसतसे विश्वासघात आणि धक्कादायक कट उघड होतात.
रिलीज: 19 डिसेंबर | Netflix
लोकप्रिय वेब सीरिजचा चौथा आणि फायनल सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सिद्धी, दामिनी, अंजना आणि उमंग या चार मैत्रिणी आयुष्यातील मोठ्या निर्णयांना सामोरं जातात. या रोमँटिक कॉमेडी-ड्रामामध्ये सायानी गुप्ता, कीर्ती कुल्हारी, बानी जे आणि मानवी गगरू पुन्हा एकदा झळकणार आहेत.
रिलीज: 19 डिसेंबर | Prime Video
दक्षिण कोरियाची ही सायन्स-फिक्शन डिसास्टर फिल्म आहे. एका भीषण जागतिक पुरामुळे संपूर्ण जग जलमय होतं. एक AI संशोधक आणि त्याच्या लहान मुलाच्या जिवंत राहण्याच्या संघर्षाची ही थरारक कथा आहे.
रिलीज: 19 डिसेंबर | Netflix
ही एक सायकोलॉजिकल सायन्स-फिक्शन थ्रिलर आहे. एका नेत्ररोग तज्ज्ञाची कथा यात दाखवण्यात आली आहे, जो गरिबांसाठी आय क्लिनिक चालवतो, पण त्याच वेळी धोकादायक प्रयोग करत असतो. वास्तव आणि महत्त्वाकांक्षा यामधली सीमारेषा पुसली जाते.
रिलीज: 19 डिसेंबर | ZEE5
माधुरी दीक्षित यांच्या प्रमुख भूमिकेतील ही एक दमदार क्राइम थ्रिलर सीरिज आहे. 25 वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या एका महिला सिरीयल किलरची कथा यात दाखवण्यात आली आहे. तिच्याच पद्धतीने खून करणाऱ्या नव्या मारेकऱ्याला पकडण्यासाठी पोलिस तिची मदत घेतात. ही सीरिज फ्रेंच शो ‘La Mante’ वर आधारित आहे.
रिलीज: 19 डिसेंबर | Jio Hotstar
मल्याळम मिस्ट्री-कॉमेडी फिल्म. एक माजी पोलिस अधिकारी आता खासगी गुप्तहेर बनतो. हरवलेल्या पर्सची साधी केस हळूहळू एका गंभीर मर्डर मिस्ट्रीमध्ये बदलते. ममूटी यांच्या मुख्य भूमिकेमुळे ही फिल्म चर्चेत आहे.
रिलीज: 19 डिसेंबर |ZEE5
एकूणच, हा शुक्रवार ओटीटी प्रेक्षकांसाठी फुल एंटरटेन्मेंट पॅक घेऊन येतोय.