मनोरंजन

Ponniyin Selvan : मणिरत्नम यांच्या बहुप्रतीक्षित ‘पोन्नियिन सेलवन’मधील गाणे रिलीज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मणिरत्नम (Mani Ratnam) द्वारा दिग्दर्शित बहुप्रतीक्षित (Ponniyin Selvan) चित्रपट 'पोन्नियिन सेलवन' (Ponniyin Selvan) म्हणजेच PS-1 मधील पहिले गाणे रिलीज झाले आहे. 'कावेरी से मिलने' असे या गाण्याचे बोल असून हे गाणे अधिकृत यूट्यूब चॅनेलवर रिलीज करण्यात आले आहे.

या गाण्याला ए आर रहमान, स्वागत राठोड, पूजा तिवारीने आपला आवाज दिला आहे. मेहबूब यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. ए आर रहमानने हे गाणेही संगीतबद्ध केले आहे. काही मिनिटांपूर्वी रिलीज झालेल्या या गाण्याला १८ हजारांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. त्याचबरोबर या गाण्याला तीन हजारांहून अधिक लोकांनी लाईकही केले आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, जयम रवी, कार्ती, त्रिशा, ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धुलिपाला, प्रभू, आर सरथकुमार, विक्रम प्रभू, जयराम, प्रकाश राज, रहमान आणि आर पार्थिवन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT