मनोरंजन

सुभाष घई यांचा मराठी चित्रपट ‘विजेता’ प्रदर्शनासाठी सज्ज

स्वालिया न. शिकलगार

मुक्ता आर्ट्सची निर्मिती असलेला चित्रपट 'विजेता' १२ मार्च, २०२० रोजी रिलीज होणार होता; पण कोरोनाचा उद्रेक वाढल्याने चित्रपटाचे प्रदर्शन  मागे घेण्याचा निर्णय सुभाष घई यांनी घेतला. आता परिस्थिती पुन्हा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मुक्ता आर्ट्सने 'विजेता'चे पुन्हा प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला. सुभाष घई यांचा मराठी चित्रपट 'विजेता' प्रदर्शनासाठी सज्ज झालाय.

या चित्रपटात मोठमोठे नामांकित कलावंत काम करत आहेत. ज्यामध्ये सुबोध भावे,पूजा सावंत, प्रीतम कागणे, सुशांत शेलार, माधव देवचक्के, मानसी कुलकर्णी, तन्वी किशोर, देवेन्द्र चौगुले, दिप्ती धोत्रे, क्रुतिका तुलसकर आणि गौरीश शिपुरकर या कलावंतांचा समावेश आहे. खेळाची पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट आहे.

मागील नॅशनल गेम्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय नाही. महाराष्ट्राच्या स्पोर्ट्स अकॅडेमीच्या डीन वर्षा कानविंदे (मानसी कुलकर्णी) माईंड कोच म्हणून सौमित्र देशमुख (सुबोध भावे) यांची निवड करतात. सौमित्र पुढे महाराष्ट्राला जिंकवून देणं हे त्याचं ध्येय असतं.

तो सर्व खेळाडूंचे मनोबल उंचावण्याचे आणि स्पर्धा जिंकण्यासाठी प्रवृत्त करण्याचे काम करतो. त्या सर्वां मधील हरवलेला आत्मविश्वास कसा परत आणतो. त्यांना मनाच्या कुरुक्षेत्रावर जिंकायला कसं शिकवतो. हे सर्व करताना त्याच्या स्वतःच्या भूतकाळाला हरवून महाराष्ट्राला विजयपथावर कसा घेऊन जातो हे सर्व विजेतामध्ये अनुभवता येईल. येत्या ३ डिसेंबरपासून हा चित्रपट सिनेमागृहात रिलीज होईल.

या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक अमोल शेटगे आहेत. निर्माते राहुल पुरी आणि राजू फारुकी, सहनिर्माते सुरेश पै आहेत. छायालेखक उदयसिंह मोहिते आहेत. संगीत रोहन रोहन यांचे आहे. संकलक आशिष म्हात्रे आहेत.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT