Actor Pankaj Dheer Networth
मुंबई - नव्वदच्या दशकात चंद्रकांता मालिकेतून लोकप्रिय झालेले पंकज धीर यांनी जगाचा निरोप घेतला आहे. हिंदी मालिका चंद्रकांतामध्ये त्यांनी 'शिवदत्त' ही भूमिका साकारली होती. त्याचबरोबर 'महाभारत'मध्ये 'कर्ण' भूमिका साकारून त्यांनी आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली. चित्रपटासोबतच अनेक टीव्ही मालिकांमधून त्यांनी विविध भूमिका साकारलीय.
पंकज धीर यांचे १५ ऑक्टोबर, २०२५ रोजी निधन झाले. पंकज यांनी बीआर चोप्रा यांची लोकप्रिय मालिका महाभारतमध्ये कर्ण ही भूमिका साकारली होती. या मालिकेतून त्यांना घराघरात ओळख मिळाली. दीर्घकाळ कॅन्सरशी लढा दिल्यानंतर त्यांनी जगाचा निरोप घेतला.
पंकज धीर यांचा जन्म पंजाबमध्ये ९ नोव्हेंबर, १९५६ रोजी झाला होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार पंकज धीर यांची एकूण संपत्ती जवळपास ५२ कोटी रुपये आहे. त्याच्या पश्चात पत्नी अनीता धीर, मुलगा निकितन धीर, सून कृतिका सेंगर आहेत. त्यांचा मुलगा निकितन देखील टीव्ही आणि चित्रपटात काम करतो. त्याने अनेक मायथॉलॉजिकल शो देखील केले आहेत. पत्नी अनीता धीर यांनी चित्रपटात जसे 'विक्टोरिया नं. 203: डायमंड्स आर फॉरएवर', 'इक्के पे इक्का' आणि 'बॉक्सर'साठी कॉस्ट्यूम डिझायनिंग केले आहे.
रिपोर्टनुसार, त्यांच्या दीर्घकाळ करिअरमध्ये, ते प्रती एपिसोड जवळपास ६० हजार पर्यंत फी घेत होते. त्यांच्या संपत्तीमध्ये मुंबई आणि पंजाबमध्ये प्रॉपर्टी, बँक बॅलेन्स, गुंतवणूक, बिझनेस यांचा समावेश आहे. चित्रपट आणि टीव्ही मालिकांसोबत ते ब्रँड एंडोर्समेंटमधूनही कमाई करत होते. त्यांची वार्षिक कमाई १.४४ कोटींपेक्षा अधिक होती.
२००६ मध्ये त्यांनी आपल्या भावासोबत मिळून मुंबईतील जोगेश्वरी परिसरात एक रेकॉर्डिंग आणि प्रोडक्शन स्टुडिओची सुरुवात केली. त्याच्या माध्यमातून ते नवे कलाकार आणि प्रोजेक्ट्सना मंच देण्याचे काम करत होते. चित्रपट निर्मितीतही त्यांना आवड होती.