फाल्गुनी पाठक प्रत्येक शोमागे कमावते इतके पैसे pudhari
मनोरंजन

Falguni Pathak Navratri : एका गाण्यासाठी 25 रुपयांपासून सुरुवात करणारी फाल्गुनी पाठक प्रत्येक शोमागे कमावते इतके पैसे!

फाल्गुनी पाठकच्या गाण्याशिवाय प्रत्येक गरबा अपूर्ण आहे

अमृता चौगुले

नवरात्रीचा उत्सव सुरू झाला की सगळ्यात पहिल्यांदा आठवतो तो गरबा. शरीरातील उर्जेचा कस पाहणारा हा नृत्यप्रकार आणि त्याचा ताल सांभाळणारी गाणी हे नवरात्रीसाठी परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. पण गायिका फाल्गुनी पाठकच्या गाण्याशिवाय प्रत्येक गरबा अपूर्ण आहे. गेली कित्येक दशके फाल्गुनी पाठकची गाणी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहेत. विशेष म्हणजे नवरात्रीच्या दिवसात फाल्गुनीच्या स्टेजशोला प्रचंड मागणी असते. (Latest Entertainment News)

कधीपासून सुरू झाला फाल्गुनीचा प्रवास?

वयाच्या नवव्या वर्षापासून फाल्गुनी स्टेजवर गाणी गाते आहे. पण तिचे असे गाणे तिच्या वडिलांना पसंत नव्हते. अनेकदा तिला या कारणांसाठी शिक्षाही मिळाली आहे. पण तिने आपला प्रवास सुरूच ठेवला आणि आपल्याला मिळाली दांडिया क्वीन.

फाल्गुनीच्या गायनशैलीवर लोकगीतांचा मोठा प्रभाव दिसून येतो. 1990 मध्ये तिने ता थैय्या नावाचा स्वत:चा बॅंड तयार केला. यानंतर तिने अजिबात मागे वळून पाहिले नाही. चुडी जो खनकी, सावन मे मोरनी बन के, मेरी चुनर उड उड जाये या गाण्यांनी तूफान लोकप्रियता मिळवली. आजही या गाण्यांचे अनेक फॅन्स आहेत.

फाल्गुनीचे प्रत्येक शो मागे चार्जेस किती असतात?

दांडिया क्वीनला नवरात्रीच्या नऊ दिवसांत प्रचंड मागणी असते. एका रीपोर्टनुसार फाल्गुनी एका शोसाठी 25 लाखांच्या पुढे रक्कम घेते. या हिशोबाने फाल्गुनीची नऊ दिवसातील कमाई जवळपास कोटींच्या घरात असते.

बॉलीवुडमध्ये का दिसत नाही दांडिया क्वीन?

यांचे उत्तर तिने एका मुलाखतीमध्ये दिले आहे. ती म्हणते, ‘ मला शोमध्ये परफॉर्म करणे खूप आवडते. मी बॉलीवूडमधील करियरला कधी सिरियसली घेतले नाही. तिथे दुप्पट मेहनत लागते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT