बॉक्स ऑफिस: ‘जेलर 2’ची क्रेझ कमी झाली? कमाईत घसरण  file photo
मनोरंजन

Jailer2 : ‘जेलर 2’ची क्रेझ कमी झाली? कमाईत घसरण

‘उड़ता तीर’ची समाधानकारक, तर ‘नई नवेली’ आणि ‘प्रहार’ची निराशाजनक कमाई

पुढारी वृत्तसेवा

entertainment south cinema jailer2 box office collection total earning of udta teer and nayi navelli on wednesday

पुढारी ऑनलाईन : सध्या बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांमध्ये कमाईसाठी चुरस सुरू आहे. मात्र, सर्वाधिक कमाई करण्यात रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’ या चित्रपटाने आघाडी घेतली आहे. दुसरीकडे, ‘उड़ता तीर’, ‘नई नवेली’, ‘प्रहार’ आणि ‘दृश्यम 3’ यांसारखे चित्रपटही प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरत आहेत. या बातमीत जाणून घेऊया, या सर्व चित्रपटांनी बुधवारी किती कमाई केली.

‘जेलर 2’चा दबदबा कायम

सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील दमदार कमाई सुरूच आहे. चित्रपटगृहांत प्रदर्शित होऊन 14 दिवस उलटले असले, तरी चित्रपटाची कमाई सुरू आहे. मंगळवारी या चित्रपटाने 8.30 कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र, बुधवारी चित्रपटाच्या कमाईत घट झाली असून त्याने 6.55 कोटी रुपये कमावले.

यासह चित्रपटाची एकूण कमाई 423.05 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 755.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘उड़ता तीर’ची कमाई

आयुष्मान खुराना आणि सारा अली खान यांचा ‘उड़ता तीर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर समाधानकारक कमाई करत आहे. प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी चित्रपटाने 3.25 कोटी रुपये कमावले होते. बुधवारी या चित्रपटाने 2.65 कोटी रुपयांची कमाई केली. यासह चित्रपटाची एकूण कमाई 28.65 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

‘नई नवेली’ची कमाई लाखांमध्ये मर्यादित

यामी गौतमच्या हॉरर-कॉमेडी चित्रपटाची ‘नई नवेली’ची बॉक्स ऑफिसवरील कमाई संथ गतीने सुरू आहे. आता या चित्रपटाची कमाई लाखांच्या आकड्यांमध्येच मर्यादित राहिली आहे. मंगळवारी या चित्रपटाने 35 लाख रुपये कमावले होते. बुधवारी, म्हणजेच प्रदर्शनाच्या 13व्या दिवशी, चित्रपटाने केवळ 23 लाख रुपयांची कमाई केली. यासह 13 दिवसांतील चित्रपटाची एकूण कमाई 25.53 कोटी रुपये झाली आहे.

‘प्रहार’ने किती कमाई केली?

राजकुमार राव, वामिका गब्बी आणि जयदीप अहलावत यांच्या ‘प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील सुरुवातीपासूनची कमाई संथ राहिली आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन 13 दिवस झाले आहेत. सुरुवातीपासूनच या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करता आलेली नाही. बुधवारी या चित्रपटाने 29 लाख रुपयांची कमाई केली. यासह चित्रपटाचे एकूण कलेक्शन 21.29 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

‘दृश्यम 3’ची कमाई

अजय देवगणच्या सस्पेन्स-थ्रिलर ‘दृश्यम 3: द कन्क्लूजन’ या चित्रपटाची कमाई आता लाखांमध्ये आली आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन 27 दिवस झाले आहेत. मंगळवारी या चित्रपटाने 1.25 कोटी रुपये कमावले होते. बुधवारी मात्र चित्रपटाच्या कमाईत घट झाली असून त्याने 90 लाख रुपयांची कमाई केली. यासह चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 372.12 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. हा चित्रपट हळूहळू 400 कोटींच्या क्लबकडे वाटचाल करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT