‘दृश्यम ३’चा टीजर रिलीज झाला असून अजय देवगन पुन्हा एकदा विजय साळगांवकरच्या भूमिकेत दिसणार आहे. नव्या कहाणीसह सादर झालेल्या या टीजरमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटात नेमकं काय असणार, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
Ajay Devgn returns as VijaySalgaonkar Drishyam 3 release date
बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय थ्रिलर फ्रँचायझींपैकी एक असलेल्या ‘दृश्यम’चा तिसरा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. अजय देवगनच्या प्रमुख भूमिकेतील ‘दृश्यम ३’चा टीजर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.
टीजरमध्ये अजय देवगन पुन्हा एकदा विजय साळगांवकरच्या भूमिकेत दिसतो. शांत, संयमी पण अत्यंत हुशार विजय यावेळीही सत्य लपवण्यासाठी नवे डावपेच आखताना दिसतो. टीजरमध्ये केवळ रहस्याची झलक दाखवण्यात आली आहे, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
सोबतच चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. निर्मात्यांनी जारी केलेल्या१ मिनिट १३ सेकंदाच्या टीजर व्हिडिओमध्ये अजय देवगनचा व्हॉईस ओवर ऐकू येतो. ज्यामध्ये तो आपल्या परिवाराचे महत्व सांगताना दिसतो. हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी रिलीज होईल.
हे आहेत दृश्यम ३ चे कलाकार
स्टारकास्टमध्ये अजय देवगन, तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर, इशिता दत्ता, मृणाल जाधव दिसणार आहेत.
मोहनलाल दृश्यम ३ मध्ये लक्षवेधी ठरणार
'दृश्यम' हा मल्याळम चित्रपटाचा हिंदी रीमेक आहे. हिंदीमध्ये २०१५ ला दृश्यम यशस्वी ठरला. नंतर २०२२ मध्ये दुसरा भाग आला. ज्यामध्ये अक्षय खन्ना देखील दिसला. हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिस यशस्वी ठरला आथा तिसरा बाग २०२६ मध्ये रिलीज होईल, मोहनलाल यामद्ये लक्षवेधी ठरेल. त्याने दृश्यम ३ चे शूटिंग सुरू केले आहे.