तारक मेहता का उलटा चश्मा मालिका आता नव्या ट्विस्टसह प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. मालिकेतील रंजकता अधिक वाढवण्यासाठी या मालिकेत काही दिवसांपूर्वीच एका राजस्थानी कुटुंबाची एंट्री झाली होती. पण या मालिकेत प्रेक्षक अजूनही वाट पाहात आहेत ते दयाबेनची. (Latest Entertainment News)
दयाबेन साकारणारी दिशा वाकानी सध्या शो पासून लांब आहे. गेली सात वर्षे दया या शोमध्ये दिसत नाहीये. मुलीच्या जन्माचे कारण असल्याने ती शोपासून लांब असल्याचे बोलले जात आहे.
या मालिकेत तिच्या भावाची व्यक्तिरेखा साकारत असलेल्या सुंदर म्हणजेच मयूर वाकानीने दया मालिकेत परत का येत नाहीये याचा खुलासा केला आहे.
एका मुलाखती दरम्यान मयूर याबाबत बोलला आहे. मयूर म्हणतो, ‘ मी तिच्या प्रवासाला जवळून पाहिले आहे. कारण मी तिच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे. एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली आहे की जर तुम्ही इमानदारी आणि विश्वासाने काम करता तेव्हा देवाचा आशीर्वाद मिळतो. तिच्याबाबत मी हे अनुभवले आहे. पण यासोबतच तिचे कष्टही आहेत. त्यामुळेच दयाबेनच्या रूपात तिला इतके प्रेम मिळाले.’
पुढे तो म्हणतो, ‘आमच्या वडिलांनी आम्हाला कायमच योग्य शिकवण दिली आहे. खऱ्या आयुष्यातही आपल्या वाट्याला जी भूमिका येईल ती योग्यप्रकारे साकारावेच लागते. सध्या ती खऱ्या आयुष्यात ती आईच्या भूमिकेत आहे. ती प्रामाणिकपणे ही भूमिका निभावत आहे. मला खरंच वाटत आहे की ती आता त्या भूमिकेशी एकरूप झाली आहे.’
काही महिन्यांपूर्वी असित मोदी यांनी दिशा वाकानी हीची आता आणखी वाट पाहणार नसल्याचे सांगितले होते. यावेळी ते म्हणले, ‘ लग्नानंतर महिलेचे आयुष्य बदलते. अनेक जबाबदाऱ्या अंगावर पडतात. मी तिची आजही वाट पाहतो आहे. ती आली तर उत्तम आहे नाहीतर मला मालिकेसाठी दुसरी दयाबेन शोधावी लागणार आहे.