Disha Patani House Firing  x account
मनोरंजन

Disha Patani House Firing | चहा प्यायला थांबला, ऑनलाईन पेमेंट केलंच नाही; पण... दिशाच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचा असा झाला अंत

Disha Patani House Firing Accused Encounter |चहा प्यायला थांबला..ऑनलाईन पेमेंट केलंच नाही, पण.. दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचा असा झाला पर्दाफाश

स्वालिया न. शिकलगार

बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घरावर गोळीबार प्रकरमातील नवे अपडेट्स समोर आले आहे. या घटनेतेच आरोपी मुख्य शूटर रविंद्र (रोहतक) आणि अरुण (सोनीपत) उत्तर प्रदेश पोलिस आणि सोनीपत एसटीएफच्या संयुक्त कारवाईमध्ये गाजियाबादच्या ट्रोनिका सिटी परिसरात एन्काऊंटरमध्ये मारले गेले आहेत.

Disha Patani House Firing Accused Encounter news

मुंबई - अभिनेत्री दिशा पाटनीच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणारे दोन शूटर्स चकमकीत ठार झासे होते. हल्लेखोरांनी दिशाच्या घरावर अनेक राऊंड गोळीबार केला होती आणि दहशत माजवली होत. या प्रकरणी बरेली कोतवाली ठाण्यात केस दाखल झाली होती. सीएम योगी आदित्यनाथ यांनी देखील तत्काळ कारवाईचे निर्देश दिले होते. शूटर्सची ओळख रोहतकचा रविंद्र आणि सोनीपतचा अरुण अशी झाली होती. दोघे रोहित गोदारा-गोल्डी बरार टोळीचे सक्रिय सदस्य होते. दोघे अखेर कसे सापडले?

एक लाख रुपयांचे बक्षीस असलेला गुन्हेगार रवींद्र, त्याचा गुन्हेगारी इतिहास होता आणि तो यापूर्वीही अनेक प्रकरणांमध्ये सहभागी होता. पण तो घाबरला नाही. या प्रकरणाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याने आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्नही केला नाही. तो सगळीकडे उघडपणे फिरत होता आणि याच धाडसामुळे त्याला अटक झाली. गोळीबारानंतर ११ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर दरम्यान नेमके काय घडले?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणारे हे आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांशी वाचण्यासाठी अनेक रस्ते बदलत होते. त्यांनी आपल्या फोनचा वापर कधीच केला नाही. एकाने हेल्मेट घालून आपला चेहरा लपवला होता तर दुसरा शूटर बेधडकपणे वावरला. त्याने आपला चेहरा लपवला नाही.

चहाच्या दुकानात थांबले आरोपी

माहितीनुसार, गोळाबारानंतर रविंद्र एका चहाच्या दुकानात चहा प्यायला तांबला. तो तिथे दवळपास २२ मिनिटे थांबला. दुकानदारा ऑनलाईन पेमेंट केली नाही, जेणेकरून त्याचा फोन ट्रेस होऊ नये.. त्याने रोख पैसे दुकानदाराला दिले. रविंद्रचा चेहराच नाही तर त्याच्या लाल रंगाच्या (एका ब्रँडचे शूज) बुटांच्या मदतीने पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचता आले.

रामपूरमध्ये थांबले आरोपी

गोळीबारा आधी ११ सप्टेंबर रोजी दोघे रामपूरमध्ये एका हॉटेलमध्ये थांबले होते. येथे शूटरची पहिली टीम नकुल आणि विजयला भेटले. माहिती दिला आणि मग निघून गेले. अरुण-रविंद्र हॉटेलमध्ये जेवले, आराम केला. मग रात्री १२ वाजता निघाले. रात्री उशीरा दिशाच्या घराबाहेर गोळीबार केला.

पोलिसांना असे सापडले आरोपी

दोन्ही आरोपींना पकडण्यासाठी एसटीएफ आणि दिल्लीच्या स्पेशल टीमने सीसीटीव्ही फुटेजचा तपास केला. दिल्लीच्या मार्गाने गाजियाबाद कडे जाताना त्यांचा पिच्छा केला. सी टेन पोलिस ठाण्यापासून चारशे मीटर अंतरावर पोलिसांच्या गाडीने आरोपींना घेराव घातला. दोघांनी गोळीबार करायला सुरुवात केली. जवळपास १० राऊंड गोळीबार केली. यामध्ये एक जवान देखील जखमी झाला. चकमकीत दोघे गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांनी रुग्णालयात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT