Aishwarya Rai Salman khan | ऐश्वर्या राय- सलमान खानच्या प्रेमकहाणीबद्दल प्रल्हाद कक्कड यांच्याकडून गुपित उघड
Prahlad Kakkar on Aishwarya Rai Salman
मुंबई - चित्रपट दिग्दर्शक प्रल्हाद कक्कड यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकारांबद्दल अनेक खुलासे केले आहेत. त्यापैकी एक ऐश्वर्या राय आणि सलमान खानच्या अफेअर बद्दल त्यांनी सांगितले. कशाप्रकारे सलमान खान ऐश्वर्याच्या घरी जाऊन तमाशा करत असे आणि दोघांच्या ब्रेकअपचे वृत्त समोर येण्याआधी दोघांच्यातील नाते संपुष्टात आले होते.
एका मुलाखतीत प्रल्हाद कक्कड यांनी सांगितले की, बॉलिवूडमध्ये तिला कुणी पाठिंबा दिला नाही. त्यामुळे ती खूप तुटली होती. प्रल्हाद यांनी सांगितलं की, त्यांनी स्वत: या गोष्टी पाहिल्या आहेत. आणि त्यांनी जाणलं की, ब्रेकअपनंतर ऐश्वर्या रायच्या आयुष्यावर विशेष करून प्रोफेशनल आयुष्यावर काय परिणाम झाला.
जेव्हा प्रल्हाद यांना विचारण्यात आले की, हे सर्व स्वत: ऐश्वर्याने त्यांना सांगितले आहे. तेव्हा ते म्हणाले, "नाही, मला हे सर्व माहिती आहे. कारण, मी ऐश्वर्या सोबत एकाच इमारतीमध्ये राहत होतो. तो घरच्या वेटिंग एरियामध्ये येऊन दंगा करायचा. सलमान भिंतीवर डोके आपटायचा."
बॉलिवूड इंडस्ट्रीने ऐश्वर्याची सोडली साथ
एका युट्यूब चॅनलवर बोलताना प्रल्हाद कक्कड म्हणाले- मी केवळ फक्त साथ देत होतो. मी म्हणालो, 'या सर्व गोष्टींची चिंता करू नको. पण इंडस्ट्री...' तिला या गोष्टीचं वाईट वाटत होतं की, सलमान मुळे संपूर्ण इंडस्ट्रीने तिची साथ सोडली. तिला वाटायचं की, तिच्यासोबत धोका झाला आहे."
ब्रेकअप जाहीर होण्याआधीच नातं संपलं
कक्कड पुढे म्हणाले की, जरी माध्यमांमध्ये ऐश्वर्या-सलमानच्या ब्रेकअपच्या बातम्या नंतर गाजल्या, तरी प्रत्यक्षात त्यांचं नातं याआधीच संपुष्टात आलं होतं. ‘‘दोघांनीही एकमेकांपासून दूर जाण्याचा निर्णय अधिकृत घोषणा होण्याआधीच घेतला होता. त्यांच्या नात्याचा शेवट अचानक झाला असं नव्हतं, तर त्या काळातील परिस्थितीमुळे हळूहळू नातं तुटत गेलं,’’ असा उल्लेख त्यांनी केला. ऐश्वर्या रायचे पालक आणि स्वत: ती ब्रेकअप नंतर थोडीशी आरामाने राहू शकली, असेही त्यांनी नमूद केले.
ऐश्वर्या राय आणि सलमान खानची जोडी
१९९० च्या दशकाच्या शेवटी आणि २००० च्या सुरुवातीला सलमान-ऐश्वर्याची जोडी इंडस्ट्रीतील चर्चेचा विषय ठरली होती. दोघे ‘हम दिल दे चुके सनम’ या सुपरहिट चित्रपटानंतर जवळ आले. मात्र काही वर्षांतच त्यांच्या नात्यात मतभेद झाले आणि अखेर दोघे कायमचे वेगळे झाले. त्यानंतर ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत संसार थाटला, तर सलमान आजही अविवाहित आहे.

