Disha Pardeshi play role of tulja in tv serial Lakhat Ek Amcha Dada
दिशा परदेशी नव्या मालिकेत दिसणार आहे Disha Pardeshi Instagram
मनोरंजन

'लाखात एक आमचा दादा' : मॉडेल-नृत्यांगनाही..दिशा परदेशीने सांगितले अनुभव

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत दिशा परदेशी 'तुळजा' ची भूमिका साकारत आहे. तिच्याशी झालेल्या संवादात तिने आपल्या भूमिकेबद्दल आणि आपल्या खासगी आयुष्याबद्दल संवाद साधला. "तुळजा एक सुंदर, सुशील डॉक्टर आहे, स्वभावाने प्रामाणिक आणि अभ्यासात अतिशय हुशार आहे. इतर मुलींना ही अभ्यासासाठी प्रोत्साहित करते. तिला वाटतं की मुलगी शिकली तरच तिची प्रगती होईल आणि ती स्वतःच अस्तित्व ह्या जगात निर्माण करू शकेल. ती नम्र, सर्वांचा आदर करणारी आणि समजूतदार आहे पण गरज पडली तर आरे ला कारे करणारी आहे.

तुळजा श्रीमंत घरातली मुलगी आहे. तुळजाच्या घरात तिचे बाबा, मोठा भाऊ, लहान भाऊ आहेत सगळ्यात वेगळी गोष्ट म्हणजे तिच्या दोन आई आहेत. तिचे बाबा आणि मोठा भाऊ कडक शिस्तीचे आहेत. तुळजा लहानपणापासून अभ्यासात चांगली असल्याकारणाने घरच्यांनीच निर्णय घेतला की तिला डॉक्टर बनवायचं म्हणून तिला गावाबाहेर पुणे शहरात एम.बी.बी.एस ची तयारी करायला पाठवतात.

दिशा परदेशी काय म्हणाली?

दिशा म्हणाली, ही भूमिका माझ्यापर्यंत येण्याचा किस्सा सांगायला आवडेल मला. मागच्या वर्षी मी माझ्या एका मराठी चित्रपटाच्या शूटिंगसाठी स्कॉटलंडला गेले होते. त्याचे नाव होते ‘मुसाफिरा’. चित्रपटाचे प्रोमोशन चालू झाले. चित्रपट प्रदर्शित झाला आणि मला एके दिवशी कॉल आला. कॉलवर विचारले गेले की तुम्ही दिशा परदेशी बोलताय का आणि ‘मुसाफिरा’ चित्रपटात तुम्हीच काम केलं आहे ना आणि तो कौलं होता, वज्र प्रॉडक्शनमधून. त्यांनी सांगितले की, त्यांची नवीन मालिका येत आहे जी झी मराठीवर प्रसारित होणार आहे. आम्ही मालिकेच्या हिरोईनसाठी तुमचा विचार करत आहोत आणि आम्हाला खात्री आहे की तुम्ही त्या भूमिकेसाठी योग्य आहात. मला ही गोष्ट आणि माझी भूमिका ऐकून खूप वेगळी वाटली, आणि असा सुरु झाला तुळजाचा प्रवास.

नितीश आणि माझी खूप छान मैत्री आहे. मालिकेत आमचं एक गोड नातं आहे आणि तुम्हाला ही ते स्क्रीनवर पाहायला मज्जा येईल. नितीश उत्तम कलाकार आहे. आमची छान मैत्री असल्यामुळे एकदम मज्जेत सीन्स शूट होतात. सहकलाकारांसोबत सुद्धा छान ट्युनिंग जमलं आहे. मला खासगी आयुष्यात कोणीही दादा नाही कारण मी माझ्या आई-बाबांची एकुलती एक मुलगी आहे. पण मला चुलतभावंडे आहेत आणि त्यांच्यासोबत माझं नातं खूप प्रेमाचं आहे.

मला इथे आवर्जून सांगायला आवडेल की 'लाखात एक आमचा दादा' मध्ये जो माझ्या मोठ्या भावाची भूमिका साकारत आहे ज्याचे नाव आहे शत्रू. शत्रू आणि तुळजाच मालिकेत कडवट नातं आहे पण खऱ्या आयुष्यात माझं आणि त्याच नातं एका मोठ्या भावा आणि लहान बहिणीसारखं आहे. आमची छान मैत्री ही आहे तो माझी एक लहान बहिणी सारखी ऑफस्क्रीन काळजी घेतो.

दिशा परदेशी मॉडेल आणि नृत्यांगनाही ...

दिशा परदेशी म्हणाली, मी एक शास्त्रीय नृत्यांगना होते आणि ह्या ही आधी मी तब्बल १० वर्ष मॉडेलिंग केलं आहे. हळूहळू मॉडेलिंग सुटत गेले आणि अभिनयाकडे कल वाढत गेला. मी शेवटी हेच म्हणेन की, 'लाखात एक आमचा दादा' आणि तुळजावर तुमचा आशिर्वाद राहू दे."

'लाखात एक आमचा दादा' रोज रात्री ८.३० फक्त पाहता येईल.

SCROLL FOR NEXT