अभिनेत्री दीपिका कक्कर सध्या कॅन्सरची ट्रीटमेंट घेते आहे. यासंबंधी आणि तिच्या दैनंदिन आयुष्यातील अनेक गोष्टी या व्लॉगवर ती शेयरही करत असते. नुकताच तिने दिवाळी सेलिब्रेशनचा व्लॉग शेयर केला. यादरम्यान तिने सेलिब्रेशनसहित सध्या तिच्या ट्रीटमेंटबाबतची अपडेटही चाहत्यांना दिली. (Latest Entertainment News)
यामध्ये दीपिका सांगते की काही केसेसमध्ये लिव्हर कॅन्सरसाठी टार्गेट थेरेपी घेतल्यानंतर अनेकांचे केस जातात. यामध्ये तिलाही ट्रीटमेंटच्या गंभीर दुष्परिणामांचा सामना करावा लागतो आहे. यामुळे तिचे केस गळत आहेत. तिने या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी हेअर पॅच वापरण्याचा निर्णय घेतल्याचेही सांगितले.दीपिका पुढे म्हणते माझ्या डॉक्टरने मला सांगितले की टार्गेटेड थेरपीमध्ये फार कमी लोकांचे केस गळतात. पण माझ्या केसांकडे तुम्ही नीट पाहिले तर लक्षात येईल की माझे किती केस गळत आहेत. मी आता हेअर पॅच मागवले आहेत. या सगळ्यात मला थायरॉईडचा त्रास होतो आहे. त्यात मला हार्मोनल असंतुलनाचा त्रास होतो आहे.
मी तुम्हाला परत परत सांगू इच्छिते की आरोग्य ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. करियरवर लक्ष देणे गरजेचे आहेच. पण त्या ही पेक्षा महत्वाचे आहे आरोग्याची काळजी घेणे आणि आपल्या जीवलगांसोबत वेळ घालवा. मला जवळपास अडीच वर्षे ही औषधे घ्यायची आहेत. मला याबाबत काहीच अडचण नाही. मी यातून बरी होईन याची मला खात्री आहे.
तिच्या फॅन्सनी तिच्यावर काळजी आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. एक फॅन म्हणतो, ‘दीपिका मजबूत रहा. तुम्ही तुमच्या व्हीडियोतून अनेकांना प्रेरणा देत आहात.’ तर एकाने तिला उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.