Mithi River cleaning scam Dino-brother questioned by EOW Mumbai Police
मुंबई - मीठी नदी गाळ उपसा प्रकरणी बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियाची मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु आहे. या प्रकरणात त्याच्या भावाचे नाव देखील असून त्याचीही चौकशी सुरु आहे. आज आर्थिक गुन्हे शाखेच्या मुंबई पोलिस आयुक्तालयातील कार्यालयात ही चौकसी सुरु असल्याची माहिती मिळाली. मुख्य आरोपी केतन कदमच्या फोनमधून डिनो आणि त्याचा बाऊ सँटिनोचे नाव मिळाल्याचे समजते.
तब्बल ६५ कोटींच्या घोटाळा प्रकरणात त्याला आर्थिक गुन्हे शाखेने समन्स पाठवून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. यामध्ये त्याचा भाऊ सँटिनोला देखील बोलावण्यात आलं होतं. या प्रकरणाचा मुख्य आरोपी केतन कदमशी दोघांनी फोनवर अनेकदा बातचीत केल्याचे समोर आले आहे.
केतन कदमच्या कॉल रेकॉर्ड्समध्ये डिनो - सँटिनोचे नाव असून त्यांच्यातील बातचीतचा देखील गुन्हे शाखेने तपास केला. कॉल रेकॉर्ड शिवाय तपासादरम्यान, आर्थिक व्यवहारासंबंधित डिनोची चौकशी झाली. केतन आणि अन्य पार्टीच्या डील विषयी डिनो मोरियाला माहिती होती? जर यामध्ये नवी माहीती किंवा खुलसे झाले तर अधिकारी अधिक तपास वाढवतील.
मीठी नदी घोटाळा प्रकरमात केतन कदम आणि जय जोशी मुख्य आरोपी आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा घोटाळा बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) नदी खोदकाम यंत्रे आणि उपकरणांच्या भाड्यात केलेल्या कथित आर्थिक अनियमिततेशी संबंधित आहे. काही आठवड्यांपूर्वी, आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणातील दोन आरोपी केतन कदम आणि जयेश जोशी यांना अटक केली होती.