Khalistani threat Diljit Dosanjh
मुंबई - गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझला खलिस्तानी समर्थकांकडून विरोध केला जात असून त्याला पुन्हा एकदा धमकी मिळालीय. पर्थ कॉन्सर्टमध्ये घोषणेबाजी नंतर आता ऑकलँड शो रोखण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीवर पंजाबी गायक दिलजीतने कुठलही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दिलजीतच्या ऑस्ट्रेलियातील पर्थ येथील त्याच्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान काही खालिस्तानी समर्थकांनी मोठा गोंधळ घातला होता. 'खालिस्तान जिंदाबाद' अशी घोषणाबाजी करत त्यांनी वातावरण तर बिघडवलेच शिवाय धमकीही दिली. पण, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तात्काळ हस्तक्षेप केला. पण, परिस्थितीचे गांभीर्य़ पाहता यावेळी दिलजीतने शांततेने आपला परफॉर्मन्स सुरू ठेवला होता. आता, खलिस्तानी समर्थकांनी त्याला पुन्हा एकदा धमकी दिली असून न्यूझीलंडमधील ऑकलंडमध्ये त्याचा आगामी कार्यक्रम रोखण्याची धमकी दिली आहे. यावेळी हजारोंच्या गर्दीने टाळ्यांचा गडगडाट आणि चियर्स सोबत दिलजीतला प्रोत्साहन दिले.
माहितीनुसार, खालिस्तानी समर्थक संघटनांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, ते दिलजीतचा शो अजिबात होऊ देणार नाहीत. विदेशातील काही खालिस्तानी संघटना भारतीय कलाकारांवर दबाव टाकण्याच्या प्रयत्नात आहेत.
अमिताभ बच्चन यांचे आशिर्वाद घेतल्याने नोंदवला होता आक्षेप
दिलजीत विरोधात धमक्या तेव्हा पासून या धमक्या येऊ लागल्या, जेव्हा ‘कौन बनेगा करोडपती १७’ मध्ये अमिताभ बच्चन यांचे आशिर्वाद घेताना पाहण्यात आले होते. त्यामुळे खलिस्तानी समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती. एका बंदी घातलेल्या संघटनेने त्याच्यावर निशाना साधत एक व्हिडिओ जारी केला होता.