Dia Mirza  pudhari
मनोरंजन

Dia Mirza On Nawazuddin: काय ते बोलणं.. काय ते वागणं.. एकदम 'बदतमीज किरदार'; दिया मिर्झा नवाजुद्दीनबद्दल नेमकं काय म्हणाली?

Anirudha Sankpal

Dia Mirza On Nawazuddin Siddiqui: अभिनेत्री दिया मिर्झाची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. ज्यात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वागण्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

नवाजुद्दीन सोबत काम करणे एका वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही त्याला कसं बोलावं हे कळत नाही असे धक्कादायक वक्तव्य करण्यात आलं आहे. त्यामुळे रसिकांना चित्रपट सृष्टीत आता नवा वाद सुरू झाला आहे का अशी शंका येऊ लागली आहे. तर काही जाणकार रसिक हे नवीन प्रोजेक्टच प्रमोशन असल्याचं सांगत आहेत.

काय म्हणाली दिया मिर्झा?

दिया मिर्झा आपल्या पोस्टमध्ये म्हणते, 'काम करणे एका वाईट स्वप्नासारखे आहे. बोलण्याची पद्धतच नाही. ताठरपणा तर हद्द करणारा आहे. एकदम बदतमीज किरदार! नवाजुद्दीन सिद्दीकी.' दिया मिर्झाची ही पोस्ट सोशलवर आल्यावर अनेक लोकांना दोघे एकत्र प्रोजेक्ट करत आहेत त्याचे प्रमोशन सुरू असल्याचा दावा केला तर काहींनी इंडस्ट्रीतील नवीन वाद समोर आला का अशी चर्चा सुरू केली आहे.

दिया मिर्झा अन् नवाजुद्दीनची सीरिज

जियो हॉटस्टारवर लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकी आणि दिया मिर्झा यांची एक मेडिकल ड्रामा सीरिज रिलीज होणार आहे. या सीरीजच्या प्रमोशनसाठीच दिया मिर्झाने ही पोस्ट केल्याचा अंदाज वर्जवला जात आहे. आगामी सीरिजचे नाव हे डॉक्टर हसन असं आहेत. या सीरिजमध्ये सिद्दीकी डॉक्टर इमरान हसनची भूमिका करत आहे. तर दिया मिर्झा डॉक्टर पलक जैन हे पात्र साकारत आहे. ही सीरीज रोहन सिप्पी दिग्दर्शित करत आहे. ही ११ डिसेंबरला ओटीटीवर रिलीज होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT