Dhurandhar Exam Question Paper: सध्या देशभरात धुरंधर 2 ची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. थिएटरपासून सोशल मीडियापर्यंत या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. आता या चित्रपटाने विद्यार्थ्यांच्या परीक्षेमध्येही एन्ट्री केली आहे. एक अकाउंट्सच्या प्रश्नपत्रिकेचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि त्यामागचं कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
अकाउंट्सच्या प्रश्नांमध्ये A, B, C किंवा साधी नावं वापरली जातात. मात्र या प्रश्नपत्रिकेत थेट ‘धुरंधर 2’मधील पात्रांची नावे वापरण्यात आली आहेत. तीन वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये चित्रपटातील विविध पात्रांची नावे टाकण्यात आली आहेत.
पहिल्या प्रश्नात जमील जमाली, एसपी चौधरी असलम आणि यालिना जमाली अशी नावे आहेत. दुसऱ्या प्रश्नात अजय सन्याल, सुषांत बंसल आणि मोहम्मद आलम ही नावे आहेत. तर तिसऱ्या प्रश्नात हमजा अली मझारी, रहमान डकैत आणि उजैर बलोच या पात्रांची नावे आहेत.
ही प्रश्नपत्रिका पाहून विद्यार्थी आणि नेटिझन्स दोघेही आश्चर्यचकित झाले आहेत. काहींनी मजेशीर प्रतिक्रिया देत म्हटलं, “चित्रपट पाहिल्यानंतर आता अभ्यास करायचा आहे!” तर काहींनी शिक्षकांच्या क्रिएटिव्हिटीचं कौतुक केलं.
या प्रश्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. अनेक युजर्सनी कमेंट करत म्हटलं की, “धुरंधर इतका व्हायरल झाला आहे की शिक्षकही फॅन झालेत!” काहींनी तर याला “सर्वात भन्नाट क्रॉसओव्हर” असंही म्हटलं आहे.
‘धुरंधर 2’ केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही, तर लोकांच्या दैनंदिन आयुष्यातही एन्ट्री करत असल्याचं या घटनेवरून दिसून येत आहे. चित्रपटातील डायलॉग, गाणी आणि पात्रं इतकी लोकप्रिय झाली आहेत की त्याचा प्रभाव प्रश्नपत्रिकेत दिसत आहे.