Dhurandhar Box Office Collection latest update  instagram
मनोरंजन

Dhurandhar Box Office Collection | अखेर १ हजार कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट 'धुरंधर', भल्याभल्या चित्रपटांना सहज टाकले मागे

Dhurandhar Box Office Collection - धुरंधरने ख्रिसमसला जमवला मोठा गल्ला, रणवीर सिंगच्या चित्रपटाने किती कोटी कमावले?

स्वालिया न. शिकलगार

रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी करत १ हजार कोटींचा टप्पा पार केला आहे. जबरदस्त कथा, भव्य मांडणी आणि रणवीरच्या दमदार अभिनयामुळे चित्रपटाला देशासह परदेशातही प्रचंड प्रतिसाद मिळत असून ‘धुरंधर’ सध्या बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टरपैकी एक ठरला आहे.

Dhurandhar Box Office Collection latest news

बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा रणवीर सिंगच्या चर्चित चित्रपट ‘धुरंधर’ची प्रशंसा होत आहे. चित्रपट अखेर १ हजार कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. रिलीजपासूनच जोरदार कमाई करणाऱ्या या चित्रपटाने आता चार अंकी कमाईचा टप्पा गाठत भल्याभल्या बिग बजेट चित्रपटांना सहज मागे टाकले आहे. यामद्ये हॉलिवूडपट अवतार-फायर अँड ऍशचा देखील समावेश आहे.

‘धुरंधर’ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करताना परदेशातील बाजारपेठेतही मोठी झेप घेतली. उत्तर अमेरिका, मध्य पूर्व, युरोप आणि ऑस्ट्रेलियामध्ये चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळाला. विशेषतः रणवीर सिंगसाठी ‘धुरंधर’ हा केवळ आणखी एक हिट चित्रपट नसून करिअरमधील मैलाचा दगड ठरला आहे. यापूर्वी अनेक सुपरहिट चित्रपट दिल्यानंतरही १ हजार कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणाऱ्या मोजक्या कलाकारांमध्ये आता रणवीरचे नाव समाविष्ट झाले आहे. एक्स अकाऊंटवर जिओ स्टुडिओजने पोस्ट करत चित्रपट १ हजार कोटींच्या क्लबमद्ये समाविष्ट झाल्याचे जाहीर केले आहे.

जिओ स्टुडिओजने धुरंधरची वर्ल्ड वाईड कमाई १००६.७ कोटी रुपये झाल्याचे म्हटले आहे. 'धुरंधर'ला ख्रिसमसच्या सुट्टीचा मोठा फायदा झाला. तिसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाने चांगली कमाई केली. २१व्या दिवशी (२५ डिसेंबर) रोजी बॉक्स ऑफिसवर २६ कोटींची कमाई केली आहे.

आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटातील कलाकारांचे अभिनय, कथा, दृश्ये, सिनेमॅटोग्राफी आणि संगीत सर्वच पातळीवर कौतुक केले. अजुनही चित्रपटाने आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. आता या चित्रपटाचे भारतातील एकूण कलेक्शन ६३३.५० कोटी रुपये झाले आहे.

पहिल्या आठवड्याची कमाई : २०७.२५ कोटी रुपये

दुसऱ्या आठवड्याची कमाई: २५३.२५ कोटी रुपये

दिवस १५ : २२.५ कोटी रुपये

दिवस १६ : ३४.२५ कोटी रुपये

दिवस १७ : ३८.५ कोटी रुपये

दिवस १८ : १६.५ कोटी रुपये

दिवस १९ : १७.२५ कोटी रुपये

दिवस २० : १८ कोटी रुपये

दिवस २१ : २६.०० कोटी रुपये

एकूण: ६३३.५० कोटी रुपये

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT