

‘3 इडियट्स’ या सुपरहिट चित्रपटाच्या सिक्वेलबाबत सध्या बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. १६ वर्षांनंतर आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अधिकृत माहिती नसली तरी सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये या चर्चेमुळे प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
Aamir Khan and Rajkumar Hirani reunion 3 Idiots sequel
गाजलेला चित्रपट थ्री-इडियट्सने सर्वांनाच वेड लावले होते. आमिर खान, आर माधनव, शर्मन जोशी, करीना कपूर स्टारर चित्रपटाचा सीक्वल कधी येणार, याची चर्चा देखील सुरु होती. दिग्दर्शक राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट २००९ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे, तर प्रेक्षकांच्या मनावरही खोल ठसा उमटवला होता. रँचो, फरहान आणि राजू या तिघांची मैत्री, शिक्षण व्यवस्थेवर केलेली भाष्ये आणि ‘ऑल इज वेल’चा संदेश आजही तितकाच लोकप्रिय आहे.
आता पुन्हा आमीर खान आणि राजकुमार हिरानी एकत्र येणार असल्याची माहिती मिळतेय. तब्बल १६ वर्षांनी ते एकत्र येताहेत, चित्रपटाची कथा काय असेल, याची कल्पना निर्मात्यांना सुचली आहे. आता स्क्रिप्ट लिहिली जातेय. एका रिपोर्टनुसार, हा चित्रपट २०२६ च्या मध्यावर जून-जुलैच्या दरम्यान, रिलीज होईल, असे म्हटले जात आहे.
आमिर खान आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी याआधी ‘मुन्नाभाई MBBS’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘पीके’ आणि ‘3 इडियट्स’सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. सिक्वेलच्या कथेसाठी लेखन सुरु आहे. चित्रपटाची मूळ कथा तयार आहे आणि टीम आता पटकथेवर लक्ष केंद्रित करत आहे. निर्मात्यांना कथा दमदार हवी असल्याची माहिती मिळतेय. जुन्या कलाकारांना पुन्हा पडद्यावर पाहणे आता फॅन्ससाठी पर्वणीच असेल.
दादासाहेब फाळके बायोपिक
आमीर खान दादासाहेब फाळके बायोपिकचे शूटिंग करत आहे. आमिर खान राजकुमार हिरानी दोघे मिळून दादासाहेब फाळके यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक घेऊन येत आहेत. आता '३ इडियट्स'चा सिक्वेल जर २०२६ च्या मध्यापर्यंत रिलीज होणार असेल तर दादासाहेब फाळके बायोपिक रिलीज होण्यास अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे.
शर्मन जोशीची '3 इडियट्स' आठवण
शर्मन जोशीने एका इंग्लिश वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, त्याने ३ इडियट्सची एक गोड आठवण शेअर केली. “मी जिममध्ये सिक्स-पॅक ॲब्स बनवत होतो, तेव्हा मला राजू सरांचा अंतिम कॉल आला. ते मला म्हणाले, 'आता ३ वर्षांपर्यंत तू जिमचे तोंड पाहणार नाहीस.'
त्याने पुढे सांगितले की, जेव्हा जेव्हा तो '३ इडियट्स'बद्दल विचार करतो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हसू येते. ज्या दिवसापासून त्याने कथा ऐकली, तेव्हापासून आजपर्यंत हा चित्रपट त्याच्यासाठी एका परीकथेसारखा आहे.
'स्टाईल' चित्रपटामुळे मी '३ इडियट्स'पर्यंत पोहोचलो. राजू सरांनी मला त्या चित्रपटात पाहिले होते आणि त्यांना वाटले होते की एके दिवशी ते मला त्यांच्या एखाद्या चित्रपटात घेतील.
- शरमन जोशी, अभिनेता