‘धुरंधर’च्या यशानंतर अर्जुन रामपालचा FA9LA गाण्यावर क्लबमध्ये केलेला डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याच्या फिटनेस, स्वॅग आणि एनर्जीक अंदाजामुळे चाहते प्रभावित झाले असून, वयाला आव्हान देणारा हा डान्स परफॉर्मन्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
Arjun Rampal dance viral after Dhurandhar success
बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल पुन्हा एकदा लक्षवेधी ठरला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर त्याची चर्चा होताना दिसतेय. या यशानंतर अर्जुन रामपालचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, तो FA9LA या लोकप्रिय गाण्यावर क्लबमध्ये डान्स करताना दिसत आहे.
अक्षय खन्नावर चित्रीत करण्यात आलेले बहरीन गाणे 'FA9LA' वर तो डान्स करताना दिसत आहे. 'धुरंधर'च्या पहल्या भागाची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त पकड आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात अर्जुनने पाकिस्तानी आयएसआय अधिकारी मेजर इकबालची भूमिका साकारलीय. २०२५ च्या वर्षाअखेरीस आठवड्यात अर्जुन रामपालने एका क्लबमध्ये एन्ट्री घेतली. सोशल मीडियावर व्हायरल झालेले बहरीन गाणे 'FA9LA' वर डान्स करताना दिसला. अर्जुनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये अर्जुन रामपालचा स्टायलिश लूक, स्वॅग लक्ष वेधून घेतो. काळ्या रंगाच्या ट्रेंडी आऊटफिटमध्ये तो डान्स फ्लोअरवर ठुमके घेताना दिसतो आहे. त्याची एनर्जी आणि फिटनेस पाहता वय हा त्याच्यासाठी केवळ आकडा आहे. अनेक फॅन्सनी कॉमेंट्समध्ये “एज इज जस्ट अ नंबर” असं म्हटलं आहे.
FA9LA गाण्यावरचा हा डान्स व्हिडिओ इन्स्टाग्राम, फेसबुक आणि एक्स (ट्विटर)वर वेगाने शेअर केला जात आहे. काही तासांतच या व्हिडिओने हजारो लाईक्स आणि शेअर्स मिळवले आहेत. या यशानंतरचा त्याचा हा व्हायरल डान्स म्हणजे त्याच्या आनंदाचा आणि सेलिब्रेशनचा भाग असल्याचं दिसतं.
अर्जुनने केले कौतुक
अक्षय खन्नाच्या रहमान डकैत या भूमिकेचे कौतुक करताना अर्जुनने लिहिले - त्याने एक उल्लेखनीय अभिनय केला आहे. रणवीर सिंह (हमजा अली मजारीची भूमिका) आणि संजय दत्त, राकेश बेदी आणि इतर कलाकारांचेही अभिनंदन केले.
'धुरंधर' २ बद्दल
'धुरंधर'च्या दुसऱ्या भागात मेजर इक्बाल आणि हमजा अली मजारी यांच्यातील संघर्षाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. 'धुरंधर'च्या दुसऱ्या भागात अर्जुन रामपालचे पात्र, मेजर इक्बाल, आणखी धोकादायक आणि निर्दयी असेल, असे म्हटले जात आहे.