Dharmendra Hema Malini Prakash Kaur Pudhari
मनोरंजन

Dharmendra Hema Malini Prakash Kaur: हेमामालिनी की प्रकाश कौर? सध्या धर्मेंद्र कुणासोबत राहतात? बॉबी देओलने स्पष्टच सांगितले

त्यांनी सिनेमात येण्यापूर्वी प्रकाश कौर यांच्याशी लग्न केले

अमृता चौगुले

आपल्या देखण्या लूक्स आणि पिळदार शरीरयष्टीने सिनेसृष्टीत ही मॅनचा किताब मिळवणारे कलाकार म्हणजे धर्मेंद्र. कारकीर्दीइतकेच धर्मेंद्र यांचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिले.

विशेषत: त्यांचा दुसरे लग्न करण्याचा निर्णय. त्यांनी सिनेमात येण्यापूर्वी प्रकाश कौर यांच्याशी लग्न केले. पण सिनेसृष्टीत प्रवेश केला आणि ते हेमामालिनी यांच्या प्रेमात पडले. हेमा यांच्याशी धर्मेंद्र यांनी लग्न केले. पण पहिली पत्नी प्रकाश कौर यांना घटस्फोट दिला नाही. (Latest Entertainment News)

धर्मेंद्र सध्या कुणासोबत राहतात?

बॉबीने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केले की, त्याचे वडील सध्या आई प्रकाश कौर यांच्यासोबत राहतात. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये धर्मेंद्र यांनी ते एकटे असल्याच्या गोष्टीबाबत हिंट केली होती.

यावर बॉबी म्हणतो, ‘ माझी आई देखील तिथेच आहे. ते दोघे सध्या खंडाळ्यातील फार्महाऊसवर आहेत. माझे आई वडील तिथे एकत्र राहतात. त्यांना फार्महाऊसवर राहायला आवडते. ते आता वयस्कर झाले आहेत. पण फार्महाऊसवर राहणे त्यांच्यासाठी जास्त सोयीस्कर आहे.

माझे वडील जास्त भावनिक आहेत

पुढे बोलताना बॉबी म्हणतो, माझे वडील जास्त भावनिक आहेत. त्यांना भावना शेयर करायला आवडते. पण कधी कधी जास्त बोलून जातात किंवा लिहून जातात. त्यावेळी त्यांना विचारले की हे काय केले? त्यावेळी सांगतात की माझ्या मनात आले की मी लिहितो. खरे तर आम्ही त्यानं वरचेवर भेटायला जातो. पण कधी कधी आम्ही कामात असू तेव्हा त्यांना तसे वाटत असावे. त्यांची पोस्ट किती लोक वाचत असावेत याची त्यांना कल्पनाही नाही.’

वयाच्या 19 व्या वर्षी झाले होते धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांचे लग्न. या लग्नापासून त्यांना चार मुलेही झाली. सनी, बॉबी, विजेता आणि अजिता अशी त्यांची नावे आहेत. हेमाशी लग्न करण्याची मनीषा बाळगून असलेल्या धर्मेंद्र यांना प्रकाश यांच्यापासून घटस्फोट हवा होता.

पण प्रकाश यांनी त्याला नकार दिला. यानंतर धर्मेंद्र यांनी मुस्लिम धर्म स्वीकारत हेमा यांच्याशी लग्न केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT