

शेरी सिंहने मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या नावावर केला आहे. भारतीय नावाचा डंका फिलिपाईन्समध्ये वाजला आहे. विवाहित महिलांसाठी असलेल्या या स्पर्धेत 120 स्पर्धकांना मागे सारून शेरी सिंगने ही स्पर्धा जिंकली आहे. ही 48 वी मिसेस युनिव्हर्स स्पर्धा होती. (Latest Entertainment News)
ही स्पर्धा फिलिपीन्सच्या मनिला शहरात आयोजित केली होती. यास्पर्धेतील 120 स्पर्धकांनी त्यांची देश, संस्कृति, बुद्धिमत्ता आणि विचारधारा या मंचावर सादर केल्या. या स्पर्धेतील शेरीने शालीनता, वाक्पटुता आणि मजबूत सामाजिक दृष्टिकोन यासगळ्यांच्या माध्यमातून परिक्षकांचे मन जिंकले. शेरीने 2025ची मिसेस इंडिया स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर तिला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.
शेरीचा विजय केवळ तिच्या बाह्य सौंदर्यावर आधारित नव्हता. पण तिच्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक कार्यातील सक्रिय सहभागयावरही परीक्षकांनी विशेष लक्ष दिले. याशिवाय तिचे महिला सशक्तीकरण आणि मानसिक आरोग्य यासंबंधी जागरूकता या देखील तिच्या कार्याची दखल घेतली गेली. सध्या मानसिक आरोग्य ही जागतिक समस्या बनत चालली आहे. शेरीने हे मुद्दे आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन स्वत:च्या संवेदनशीलतेचा आणि दूरदृष्टीचा परिचय करून दिला. तिचा आत्मविश्वास आणि या विषयांवरील दृष्टिकोण तिला विजेता बनवण्यास कारणीभूत ठरले आहे.
मिसेस युनिव्हर्सचा क्राऊन जिंकल्यानंतर तिने एक मेसेज दिला. ती म्हणते, ‘हा विजय फक्त माझा नाही, तर त्या प्रत्येक महिलेची आहे जीने चौकटीच्या बाहेर जाऊन स्वप्न बघण्याचे धाडस केले आहे. मी जगाला दाखवणार होते की ताकद, दयाळूपणा आणि बदल स्विकारण्याची क्षमताच खरी सुंदरता आहे.’