Dharmendra Last Message Instagram
मनोरंजन

Dharmendra Last Message | 'काही चूक झाली असेल तर माफ...' 'इक्कीस'च्या शेवटच्या शूटिंगचा व्हिडिओ; धर्मेंद्र यांना पाहून फॅन्सच्या डोळ्यात पाणी

Dharmendra Last Message Ikkis Movie | 'काही चूक झाली असेल तर माफ...' 'इक्कीस'च्या शेवटच्या शूटिंगचा व्हिडिओ; धर्मेंद्र यांना पाहून फॅन्सच्या डोळ्यात पाणी

स्वालिया न. शिकलगार

धर्मेंद्र यांनी ‘इक्कीस’च्या शेवटच्या शूटिंगवेळी दिलेला भावुक निरोपाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. “काही चूक झाली असेल तर माफ…” असे म्हणत त्यांनी टीमचे आभार मानले. त्यांच्या साधेपणाने आणि विनम्रतेने चाहत्यांना व युनिटला भावूक केले असून सोशल मीडियावर त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव होत आहे.

Dharmendra Last Message Ikkis Movie

दिग्गज अभिनेतेधर्मेंद्र यांचा यांनी २४ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ८ डिसेंबर रोजी धर्मेंद्र यांचा ९० वा जन्मदिन होता. त्यांची आठवत काढत असताना, इक्किस चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांना मनापासून श्रद्धांजली अर्पण केलीय. या चित्रपटाच्या सेटवर अभिनेता धर्मेंद्र यांची शेवटची झलक पाहायला मिळतेय. इक्किस टीमने शेअर केलेला हा व्हिडिओ केवळ पडद्यामागील फुटेज नाही तर एक भावनिक निरोप आहे.

श्रीराम राघवन दिग्दर्शित 'इक्किस' चित्रपट २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा १९७१ च्या भारत-पाक युद्धातील असाधारण शौर्य दाखवणारे परमवीर चक्र पुरस्कार विजेते सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या शौर्याभोवती केंद्रित आहे. या चित्रपटात दोन स्टार-किड्स, अमिताभ बच्चन यांचे नातू अगस्त्य नंदा आणि अक्षय कुमार यांची भाची सिमर भाटिया दिसणार आहेत. या दोन्ही नवोदित कलाकारांना पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या चित्रपटात धर्मेंद्र यांनी अरुण खेत्रपाल यांची भूमिका साकारली आहे.

या चित्रपटात जयदीप अहलावत आणि विजय राज देखील आहेत, जे या युद्धकाळातील कथेचा एक भाग आहेत. त्यांच्या श्रद्धांजली पोस्टमध्ये, मॅडॉक फिल्म्सने लिहिले, "नऊ दशकांचा एक आयकॉन, ज्याने आम्हाला दाखवले की खरी महानता नम्रतेपासून सुरू होते."

व्हिडिओमध्ये, धर्मेंद्र हे क्रू आणि चित्रपटाच्या टीमशी संवाद साधत आहेत. ते स्मितहास्य करत म्हणतात, "भारत आणि पाकिस्तानने हा चित्रपट पाहिलाच पाहिजे. सीमा ओलांडून येणाऱ्यांनी हे पाहावे."

धर्मेंद्र यांचे भावूक BTS क्लिपमध्ये व्हायरल होत आहेत. त्यात चित्रपटाच्या टीमचे त्यांनी प्रेमाने कौतुक केले आणि म्हटले, "मॅडॉक फिल्म्ससोबत मला खूप आनंद झाला आहे. श्रीराम राघवन यांनी हा चित्रपट खूप छान बनवला आहे. शूटिंगच्या शेवटच्या दिवसासाठी मी थोडा आनंदी आहे. माझी काही चूक झाली असेल तर मला माफ करा."

दरम्यान, धर्मेंद यांचा नातू करण देओलचाही फोटो समोर आला आहे. करण देओल धर्मेंद्र यांचे मोठे नातू आहेत. धर्मेंद्र यांना चार नातू आहेत. सनी देओलची दोन मुले करण आणि राजवीर तर बॉबी देओलचे देखील दोन मुले धरम देओल, आर्यमन देओल आहेत. करण - राजवीर यांची धर्मेंद्र यांच्याशी खूप जवळीक होती. दोघे आपले आजोबा धर्मेंद्र यांच्यासोबतच फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT