अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत गेले काही दिवस बरी नाही. काही दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवल्यानंतर अलीकडेच त्यांना हॉस्पिटलमधून घरी नेण्यात आले. गेल्या 10 डिसेंबरला धर्मेंद्र यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यानंतर त्यांची तब्येत जास्त खालावली. यादरम्यान त्यांच्या मृत्यूची अफवा समोर येऊ लागली. यावेळी घरच्यांनी आक्षेप घेऊन त्यांच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली. (Latest Entertainment News)
पण या सगळ्यादरम्यान एक धक्कादायक बाब समोर येत आहे. मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र अॅडमिट असेलया ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे. त्याच्यावर आरोप आहे की, त्याने धर्मेंद्र यांच्यासोबत देओल कुटुंबियांचे वैयक्तिक क्षणांचा व्हिडियो चोरून रेकॉर्ड केला होता. हा व्हिडियो लिक झाल्यावर चांगलाच व्हायरल होतो आहे. आता पोलिस या व्हिडियोमागच्या बाबींची माहिती घेत आहेत.
या व्हिडियोमध्ये धर्मेंद्र हॉस्पिटल बेडवर होते. त्यांच्या शरीरांना अनेक मशीन्स जोडलेले दिसत आहेत. त्यांच्या आसपास कुटुंबीयही दिसत आहेत. त्यांच्या जवळ असलेल्या सनी आणि बॉबीच्या डोळ्यातून अश्रू दिसत आहेत. धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर त्यांच्या आसपास दिसत आहेत. त्याही भावुक होताना दिसत आहेत. त्यांना घरातील व्यक्ती आधार देताना दिसत आहे. याशिवाय त्यांचे नातू करण आणि राजवीरही दिसत आहेत.
हॉस्पिटलमधील ज्या कर्मचाऱ्याने हा व्हिडियो शूट केला आहे आणि सोशल मिडियावर व्हायरल केला आहे. त्याला ओळखून अटकही केली गेली आहे.
भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन डायरेक्टर असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पंडित यांनी धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत केल्या गेलेल्या असंवेदनशील रिपोर्टिंगबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याबाबत पोलिसांत एक तक्रारही दाखल केली गेली आहे.