
आज बिहार निवडणुकीचा निकाल आहे. सगळ्या देशाच्या नजरा या इलेक्शनवर टिकून आहेत. केवळ राजकारणीच नाहीत तर अनेक सेलिब्रिटीही या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. बिहारी जनतेने या सेलिब्रिटींचे राजकीय करियर मतपेटीत बंद केले आहे. आज हा कल नेमका कुणाच्या बाजूने आहे ते समजेल. जाणून घेऊया कोणते कलाकार राजकारणात नशीब आजमावत आहेत.
प्रसिद्ध भोजपुरी अभिनेता खेसरीलाल यादव राष्ट्रीय जनता दलातर्फे निवडणुकीच्या रिंगणात आहे. खेसारीलाल यांची लोकप्रियता बिहारी युवकांमध्ये प्रचंड आहे. आता ही लोकप्रियता राजकारणाच्या रिंगणात कितपत उपयोगी पडते हे लवकरच कळेल.
]प्रसिद्ध लोकगीत गायिका मैथिली ठाकूर ही देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. ती भारतीय जनता पार्टीची अलीनगर विधानसभेची उमेदवारी घेऊन या निवडणुकीत उतरली आहे. लोकगायिका असलेल्या मैथिलीच्या प्रतिमेचा भारतीय जनता पार्टीला किती फायदा होतो ते लवकरच समजेल.
प्रसिद्ध गायक आणि अभिनेता रितेश पांडे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ते जनसुराज पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत.
बिहारी लोकगीत गायक विनय बिहारी भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर लौरिया येथून पुन्हा एकदा मैदानात आहेत