

तुंबाडचे दिग्दर्शक राही बर्वे यांनी नुकतीच आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. ‘मयसभा' असे त्यांच्या आगामी सिनेमाचे नाव आहे. विशेष म्हणजे आजवर अनेक विनोदी भूमिकेतून आपल्या भेटीला आलेले अभिनेते जावेद जाफरी या सिनेमात दिसणार आहेत.
या पोस्टरमध्ये जावेदचा अत्यंत भयंकर अवतार दिसतो आहे. या पोस्टरमुळे लोकांची उत्सुकता वाढली आहे. 'मयसभा सिनेमाच्या पोस्टरमध्ये जावेद एका वृद्ध व्यक्तीच्या रुपात दिसत आहे. त्याचे केस लांब आणि विस्कटलेले आहेत. तर चेहऱ्यावर एक विचित्र मास्क आहे, ज्यामुळे त्याचा चेहरा ओळखणे जवळजवळ अशक्य आहे.
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये दिग्दर्शक राही म्हणतो, 'एक दशकापूर्वी, आम्ही एक वेडेपणा दाखवला होता. एक असा प्रयोग जो इतका विचित्र आणि अकल्पनीय होता की की त्या लोकांनाही जे या रसातळाशी हिम्मत ठेवतात. शेवटी हा शाप भंग झाला आहे. परमेश्वर खन्ना (जावेद जाफरी) यांचे रहस्यमय जग शेवटी उजेडात येईल. परमेश्वर खन्ना (जावेद जाफरी) यांचे रहस्यमय जग शेवटी उजेडात येईल. सोन्याच्या आपल्या शोधाचा आनंद घ्या." या सिनेमाच्या कास्ट आणि रिलीज डेटबाबत अजून काहीच समोर आलेले नाही. पण या पोस्टरने मात्र उत्सुकता वाढवली आहे.