Dhanush-Mrunal Dating buzz Instagram
मनोरंजन

Dhanush-Mrunal Dating | पार्टीत हातात हात अन् कानात कुजबूज; धनुष-मृणालच्या 'त्या' व्हिडिओमुळे डेटिंगची चर्चा

Dhanush-Mrunal Dating - पार्टीत हातात हात अन् कानात कुजबूज; धनुष-मृणालच्या 'त्या' व्हिडिओमुळे डेटिंगची चर्चा

स्वालिया न. शिकलगार

dhanush and mrunal thakur party video goes viral

मुंबई - अभिनयासाठी कॉलेज सोडून टीव्ही स्टार ते बॉलीवूड आणि साऊथ पर्यंत मृणाल ठाकुरने आपली ओळख बनवलीय. आता अनेक ट्रेंडिंग अभिनेत्रींच्या यादीत तिचे नाव सर्वात टॉपला आहे. टीव्ही मालिका 'कुमकुम भाग्य' ते मराठी, हिंदी आणि तेलुगू चित्रपटात अभिनय तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर ती चर्चेत आहे. आता ती आणखी एका कारणामुळे मृणाल चर्चेत आहे. मृणाल आणि साऊथ स्टार धनुषचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो एका पार्टीतील आहे. या व्हिडिओमुळे धनुष आणि मृणालच्या डेटिंगची चर्चा रंगलीय.

धनुषचा पत्नी ऐश्वर्या रजनीकांत हिच्याशी एप्रिल, २०२४ मध्ये घटस्फोट झाला होता. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी दोघे मोठा मुलगा यत्रच्या शाळेत एका कार्यक्रमात दिसले होते. दरम्यान, अशी चर्चा आहे की, धनुष अभिनेत्री मृणाल ठाकुरला डेट करत आहेत.

व्हिडिओमध्ये नेमकं काय दिसतंय?

धनुष नुकताच मृणाल ठाकुरच्या बर्थडे पार्टीत सहभागी झाला होता. त्या पार्टीतील एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये धनुषने मृणाल ठाकुरचा हात धरला आहे. दोघे कानात काहीतरी कुजबूज करत आहेत. त्यामुळे नेटकरी कयास लावत आहेत की, दोघे एकमेकांना डेट करत आहेत.

३ जुलैला मृणाल ठाकुर, धनुषचा 'तेरे इश्क में' चित्रपटाच्या पार्टी मध्ये दिसली होती. कनिका ढिल्लनने निर्मिती केली होती. कनिकाने नंतर काही फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये मृणाल ठाकुर आणि धनुष सोबत पोझ देताना दिसले होते. पण अद्याप धनुष वा मृणाल ठाकुर यांच्याकडून डेटिंगवर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

साऊथ-बॉलीवूडमध्ये मृणालचा डंका

मृणालला सीता रामम या साऊथ चित्रपटाला मोठे यश मिळाले. त्यासाठी ती मुंबई - हैदराबाद असा शूटिंगसाठी प्रवास करताना येत-जात होती. त्या दरम्यान, साऊथच्या एका कार्यक्रमात तिची भेट धनुषशी झाली. त्यानंतर ती पहिल्यांदा मुंबईत काजोलचा चित्रपट मां प्रीमियरवेळी धनुषला भेटली होती. सन ऑफ सरदार २ च्या प्रीमियरमध्येही धनुषचे नाव मृणालच्या गेस्ट लिस्टमध्ये समाविष्ट होते.

मृणालचा अभिनय प्रवास कसा घडला?
मृणालने पदवी पूर्ण करण्याआधीच टीव्ही इंडस्ट्रीत एन्ट्री घेतली होती. तिने 'मुझसे कुछ कहती... ये खामोशियां' मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर मृणालला खरी ओळख मिळाली ती 'कुमकुम भाग्य' मधून. या मालिकेत ती बुलबुलच्या भूमिकेत दिसली. पण तिला साऊथचे दरवाजे खुले झाले आणि साऊथमध्येही तिने आपली प्रतिमा निर्माण केली. आता ती धनुष सोबत 'तेरे इश्क में' दिसणार आहे. कृती सेनॉन देखील महत्त्वाच्या भूमिकेत असून २८ नोव्हेंबर रोजी रिलीज होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT