Dhanashree Verma Yuzvendra Chahal Row :
सोशल मीडिया इनफ्लुएन्सर धनश्री वर्मा आणि भारतीय क्रिकेटर युझवेंद्र चहल यांनी घटस्फोट घेतला आहे. मात्र हे दोघे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि दावे प्रतिदावे करत आहेत. त्यामुळं यांचं नातं सध्या चर्चेत आहे. अश्नीर ग्रोवर होस्ट करत असलेल्या राईज अँड फॉल या रिअलिटी शोमध्ये धनश्री वर्मानं युझवेंद्र सोबतचच्या वैवाहिक जीवनाबाबत अनेक मोठी वक्तव्य केली आहेत.
एका अभिनेत्रीनं धनश्री वर्माला तुला चहलसोबतचं नातं आता पुढं जाऊ शकत नाही असं कधी वाटलं असं विचारलं. त्यावर धनश्री म्हणाली, 'पहिल्या वर्षीच दुसऱ्याच महिन्यात मी त्याला पकडलं.' या दाव्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
धनश्री वर्मानं चहलसोबतच्या तुटलेल्या नात्याबद्दल पहिल्यांदाच वक्तव्य केलेलं नाही. यापूर्वीही धनश्रीनं अनेकवेळा वक्तव्य केली आहेत. तिनं घटस्फोटाचं प्रकरण सुरू होतं त्यावेळी देखील तिनं मागितलेल्या पोटगीबाबत देखील खुलासा केला. आदित्य नारायणनं विचारलेल्या प्रश्नाबाबत ती म्हणाली, 'अधिकृतरित्या याला जवळपास १ वर्ष झालं आहे. हा घटस्फोट त्वरित झाला कारण तो दोघांच्या संमतीनं झाला होता. त्यामुळंच ज्यावेळी लोकं पोटगीबद्दल बोलत आहेत ते चुकीचे आहे. मी काही बोलत नाही याचा अर्थ तुम्ही काहीही जाऊन बोलाल असा नाही.'
'माझ्या पालकांनी मला शिकवलं आहे की ज्यांच्याबाबत तुम्हाला काळजी आहे त्यांनाच तुम्ही स्पष्टीकरण द्या. त्यामुळं इतरांसाठी मी माझा वेळ का वाया घालवू?'
वर्मा पुढं म्हणाली, 'आमच्या लग्नाला ४ वर्षे झाली होती. त्याआधी आम्ही ६ ते ७ महिने एकमेकांना डेटिंग करत होतो. ज्यावेळी तुम्हाला कळतं की आता हे संपणार आहे त्यावेळी तुम्हाला वेदना तर होतात. जे काही लोक बोलत आहेत ते गरजेचं नाही ते खरं नाही. चहलनं तसं का केलं याचं मला आश्चर्य वाटतं.' धनश्री म्हणाली ठीक आहे मी कायम त्याचा आदरच करेन. मी कोणाला पुन्हा डेट करू शकेन असं मला वाटत नाही.