बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. मात्र जामिनासाठी त्यांना दोन महत्वाच्या अटी पाळाव्या लागल्या. आता या प्रकरणाची पुढील सुनावणीची तारीखही निश्चित करण्यात आली आहे.
Delhi High Court grants an interim bail to Rajpal Yadav in the cheque bounce case
चेक बाऊन्स प्रकरणी दहा दिवस तुरुंगात घालवल्यानंतर राजपाल यादवला जामीन मिळाला आहे. त्याच्या शिक्षेला अंतरिम स्थगिती मिळाली आहे. तुरुंगातून बाहेर येण्यासाठी त्याला दोन अटी पूर्ण कराव्या लागल्या. कोर्टाने नमूद केले की, दिलासा विचारात घेताना त्याच्या बँक खात्यात १.५ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. यादवने १ लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका आणि त्याच रकमेची एक जामीनपत्र सादर करावे, या अटीवर शिक्षा स्थगित करण्याचे आदेश दिले. १८ मार्चपर्यंत, जेव्हा कोर्ट पुन्हा या प्रकरणाची सुनावणी करणार आहे, तोपर्यंत तो तुरुंगाबाहेर राहील. आता पुढील सुनावणी मार्चमध्ये होईल.
नऊ कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणी १२ फेब्रुवारीला सुनावणी झाली होती. यामध्ये केवळ एका पक्षाचे म्हणणे ऐकून घेण्यात आली आणि नवी तारीख निश्चित करण्यात आली. आज १६ फेब्रुवरी, २०२६ रोजी जामीन याचिकेवर पुन्हा सुनावणी झाली. दरम्यान, कोर्टाने राजपाल यादवला निर्देश दिले की, त्यांनी आधी तक्रारदाराच्या खात्यात १.५ कोटी रुपये करावे. अभिनेत्याने ३ वाजण्याच्या आधी रक्कम जमा केली, त्यानंतर त्याला अंतरिम जामीन मिळाला.
दिल्ली हायकोर्टाने चेक बाउन्स प्रकरणी अभिनेता राजपाल यादवला १८ मार्चपर्यंत अंतरिम जामीन दिली आहे. कोर्टाने त्याला निर्देश दिले की, राजपाल यादवने आपले पासपोर्ट सरेंडर करावे. १८ मार्चला होणाऱ्या सुनावणीत त्याला प्रत्यक्षात अथवा व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून उपस्थित राहावं लागणार आहे.
राजपालच्या या कठीण काळात, चित्रपट क्षेत्रातील अनेक सहकारी त्याला समर्थन आणि मदत करत आहेत. सलमान खान, सोनू सूद, अजय देवगण यांच्याकडून पाठिंबा मिळाल्यानंतर, बॉक्सरमधून प्रकाशझोतात आलेला अभिनेता विजेंदर सिंगदेखील पुढे सरसावला आहे. त्याने राजपालला त्याच्या पुढच्या चित्रपटात भूमिका देण्याबद्दल सांगितले आहे.
विजेंदरने पोस्टमध्ये सांगितले की, "मी खऱ्या प्रतिभेचा आदर करतो. राजपालने भारतीय चित्रपटसृष्टीला खूप काही दिले आहे. त्याने विविध पात्रांद्वारे आमच्या चेहऱ्यावर हास्य आणले आहे. मी राजपाल यादवला माझ्या पुढच्या चित्रपटाचा भाग होण्यासाठी आमंत्रित करतो, जो संजू सैनी द्वारे लिहिलेला आणि दिग्दर्शित आहे आणि आम्ही यावेळी त्याला पाठिंबा देऊ इच्छितो."