Box Office de de pyar de 2
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या 'दे दे प्यार दे' चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता त्याच्या सिक्वेलला म्हणजेच 'दे दे प्यार दे 2' ला देखील खूप प्रेम मिळत आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात अजय आणि रकुल प्रीत सिंग यांच्यासोबत आर माधवन देखील आहे. आता 'दे दे प्यार दे 2' च्या गुरुवारच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. जाणून घ्या या चित्रपटाने Box Office वर किती कमाई केली?
'दे दे प्यार दे 2' चित्रपटाची गती बॉक्स ऑफिसवर मंदावली आहे. १४ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने २२ दिवसांत ७२.९७ कोटी रुपयांची एकूण कमाई केली आहे, परंतु रणवीर सिंगच्या 'धुरंधर' आणि 'तेरे इश्क में' या चित्रपटांच्या प्रदर्शनामुळे 'दे दे प्यार दे 2'च्या कलेक्शनवर मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे.
पहिल्या भागाप्रमाणेच 'दे दे प्यार दे 2' मध्ये अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंग यांची प्रमुख भूमिका आहे. विशेष म्हणजे, 'शैतान' नंतर अजय देवगण आणि आर माधवन हे दोघे पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र दिसले. १३५ कोटींच्या मोठ्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ८.७५ कोटी रुपयांची चांगली सुरुवात केली होती. सुरुवातीच्या धमाकेदार कमाईनंतर, पुढील दिवसांमध्ये कलेक्शनमध्ये लक्षणीय घट झाली आहे.
सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या अहवालानुसार, चित्रपटाने २२ व्या दिवशी फक्त ०.१७ लाख रुपये कमावले आहेत. पहिल्या आठवड्यात चांगली कमाई केल्यानंतर, दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाचे कलेक्शन दिवसेंदिवस कमी होत गेले. 'धुरंधर' सारख्या मोठ्या चित्रपटांच्या तुलनेत 'दे दे प्यार दे 2' ला प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यश मिळाले नाही.