मनोरंजन

विनोदाचा ‘झोलझाल’ या दिवशी होणार प्रदर्शित

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

विनोदाची मेजवानी हे महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांसाठी नेहमीच पर्वणी ठरली आहे. अशाच मनोरंजनाची आणि हास्याची मेजवानी 'झोलझाल' या चित्रपटातून रसिकांच्या भेटीला आलीय. 'युक्ती इंटरनॅशनल प्रोडक्शन' या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. श्री सिद्धिविनायक मंदिर, दादर येथे चित्रपटाचे पोस्टर अनावरण करण्यात आले.  चित्रपटगृहात प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास सज्ज असमारा हा चित्रपट १ जुलैला होत आहे.

'झोलझाल' चित्रपटाचे पोस्टर पाहता चित्रपटात विविधांगी भूमिका साकारलेल्या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळतेय. हास्याची कारंजे घेऊन हे कलाकार रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घ्यायला येत्या १ जुलैला येत आहेत.

या चित्रपटात मंगेश देसाई, मनोज जोशी, अजिंक्य देव, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, अमोल कागणे, सयाजी शिंदे, उदय नेने, उदय टिकेकर, प्रीतम कागणे, इशा अग्रवाल, अलिशा फरेर, सुप्रिया कर्णिक, प्रियांका खोलगडे, साईशा पाठक यांच्‍या भूमिका आहेत. अमोल लक्ष्मण कागणे आणि लक्ष्मण एकनाथ कागणे प्रस्तुत 'रोलींगडाईस' असोसिएशन सोबत 'युक्ती इंटरनॅशनल प्रोडक्शन' अंर्तगत 'झोलझाल' चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीस येत आहे. दिग्दर्शक मानस कुमार दास यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

निर्माता गोपाळ अग्रवाल, आनंद गुप्ता, संजना जी अग्रवाल यांनी केली असून, सहनिर्माते रश्मी अग्रवाल आणि विनय अग्रवाल आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद मानस कुमार, संजीव सोनी आणि आनंद गुप्ता लिखित आहेत. तर चित्रपटाच्या संगीताची बाजू प्रफुल-स्वप्नील आणि ललित रामचंद्र यांनी पेलली आहे. अमेय खोपकर चित्रपटाचे वितरक आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT