Pakistani social media user comment Comedian Abhishek Upmanyu deactivate his X account
मुंबई : एका पाकिस्तानी युजरला समर्थन देणं स्टँडअप कॉमेडियन अभिषेक उपमन्यूला भारी पडलं आहे. त्यानंतर अभिषेक उपमन्युने आपले एक्स अकाऊंट डिॲक्टिवेट केलं आहे. नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेऊया. अभिषेक उपमन्यू प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन आहे. सध्या सोशल मीडियावरील एका कॉमेंटमुळे तो चर्चेत आहे. एका पाकिस्तानी सोशल मीडिया यूजरच्या भारत-विरोधी विधानर समर्थन दर्शवत ‘हो’ लिहिल्यानंतर त्याला टीकेचा सामना करावा लागत आहे. हे प्रकरण इतकं वाढलं की, आपले एक्स अकाऊंट त्याला डिॲक्टिवेट करावं लागलं.
सोशल मीडियावर एका युजरने लिहिलं होतं की, ''भारतीयांना पाश्चिमात्य देशांमध्ये ज्या वर्णद्वेषाचा सामना करावा लागतो ते लायक आहे.'' या पोस्टवर अभिषेक उपमन्युने ‘हो’ लिहून कॉमेंट केलं. त्यानंतर सोशल मीडियावर कॉमेंट्सचा पाऊस पडला. स्टँडअप कॉमेडियन अभिषेक उपमन्युला हो शब्द लिहिणं भारी पडलं. अभिषेक उपमन्युला सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागला.
पहलगाम हल्ल्याचा विषय संवेदनशील असताना उपमन्युची या प्रतिक्रियेवर लोकांनी लोकांचा संताप व्यक्त केलाय.