Hardik Pandya - Esha Gupta  Pudhari
मनोरंजन

Esha Gupta Hardik Pandya Dating | हार्दिक पांड्यासोबत चॅटिंग, डेटिंग... अभिनेत्री ईशा गुप्ताचा मोठा खुलासा

Esha Gupta Hardik Pandya Dating | एका पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत ईशाने हार्दिकसोबतच्या रिलेशनशिपविषयी खुलेपणाने मत व्यक्त केले

पुढारी वृत्तसेवा

Esha Gupta Hardik Pandya Dating chatting relationship Koffee With Karan controversy

मुंबई : क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याचे नाव अनेकदा विविध रिलेशनशिप्समध्ये समोर आले आहे. बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींशी त्याची मैत्री आहे. त्यापैकी एली अवरामसोबत तो रिलेशनशिपमध्ये होता, असे बोलले जाते. दोघे अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले होते. नंतर ते वेगळे झाले.

सर्बियन मॉडेल आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविचसोबत हार्दिक पांड्यानं 2020 मध्ये साखरपुडा केला आणि नंतर लग्न केलं. त्याच वर्षी त्यांच्या मुलाचा अगस्त्य याचा जन्म झाला. नताशा आणि हार्दिकचं नातं सोशल मीडियावर कायम चर्चेत राहिलं आहे. आता त्यांचा घटस्फोट झाला आहे. आता अभिनेत्री ईशा गुप्ताने हार्दिकसोबत रिलेशनशिपवर भाष्य केले आहे.

काय म्हणाली ईशा ?

प्रसिद्ध पत्रकार सिद्धार्थ कन्नन यांच्यासोबत झालेल्या एका मुलाखतीत ईशाने स्पष्ट केलं की, हार्दिकसोबत तिचं नातं फार काळ टिकलेलं नव्हतं आणि ते दोघं फक्त काही काळ एकमेकांशी ‘बोलत’ होते – ते नातं कधीच अधिक पुढे गेलं नाही.

ईशा गुप्ता म्हणाली, “हो, काही काळ आम्ही बोलत होतो. पण मी असं म्हणणार नाही की आम्ही डेट करत होतो. आम्ही फक्त त्या टप्प्यावर होतो – 'शक्यतो होईल, नाहीतर नाही' अशा अवस्थेत. ते काही महिन्यांतच संपलं. त्यामुळे मी म्हणेन, आमचं नातं कधीच ‘डेटिंग-डेटिंग’ नव्हतं.”

ती पुढे म्हणाली की ते फक्त एक-दोन वेळा भेटले आणि त्यानंतर संवाद थांबला. नातं का वाढलं नाही याबद्दल ती म्हणते, “शक्यतो काहीतरी होऊ शकलं असतं, पण वेळ आणि विचारसरणी जुळली नाही. कोणताही वाद किंवा कटुता नव्हती, पण ते नातं होणारच नव्हतं.”

‘कॉफी विथ करन’वादावरील प्रतिक्रिया

हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल हे दोघे करन जोहरच्या ‘कॉफी विथ करण’शोमध्ये गेले होते. तेव्हा शोमधील अश्लील शेरेबाजीवरून हार्दिक चर्चेत आला होता. तेव्हा अनेकांनी त्याच्यावर टीका केली होती.

ईशाने सांगितलं की त्यावेळी त्यांचं नातं संपलेलं असल्याने या प्रकरणाचा तिच्यावर काही प्रभाव पडला नाही.तो वाद माझ्यावर परिणाम करणार नव्हता, कारण तेव्हा आमचं बोलणं बंद झालं होतं,” असं ती म्हणाली.

ती म्हणते की तिनं मुद्दाम वादात उडी घेतली नाही. “ते आधीच खूप गोष्टींचा सामना करत होते. मी आणखी टीका केली असती, तर त्याचा काही उपयोग झाला असता का? मी आता मानसिकदृष्ट्या परिपक्व झाले आहे आणि मागच्या गोष्टींमध्ये अडकून राहणं मला आवडत नाही,” असंही ती म्हणाली.

हार्दिकशी का संपलं नातं?

ईशाने स्पष्ट केलं की तिला प्रसिद्धीपासून दूर, शांत आणि स्थिर नाती हवी असतात. “मला मोजक्या लोकांत राहणं, आणि रिलेशनशिप हे वैयक्तिक ठेवणं आवडतं. कदाचित हार्दिकच्या सार्वजनिक जीवनशैलीमुळे ते शक्य झालं नाही,” असं ती म्हणाली.

ईशाचे आगामी प्रोजेक्ट्स

ईशा गुप्ता नुकतीच आश्रम या सीरीजमध्ये बॉबी देओलसोबत झळकली होती. याआधी तिने ‘वन डे: जस्टिस डिलिव्हर्ड’ या चित्रपटात डीसीपी लक्ष्मी राठीची भूमिका केली होती. सध्या चर्चा आहे की ती ‘हेरा फेरी 3’ च्या कास्टमध्ये ती सामील होऊ शकते, मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT