चंद्रिका दीक्षित 
मनोरंजन

Bigg Boss OTT 3 : कोण आहे ‘वडापाव गर्ल’ चंद्रिका दीक्षित? नोकरी सोडून केला व्यवसाय

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'वडा पाव गर्ल' नावाने प्रसिद्ध चंद्रिका दीक्षित आता रिॲलिटी टीव्ही शो 'बिग बॉस ओटीटी' सीजन ३ मध्ये दिसणार आहे. शोचा प्रोमो व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. चंद्रिका हिला 'वडा पाव गर्ल' नावाने ओळखले जाते. वडा पाव गर्ल कोण आहे? तिला इतकी प्रसिद्धी कशी मिळाली?

अधिक वाचा –

एका व्लॉगरच्या व्हायरल क्लिपने बदललं चंद्रिकाचं आयुष्य

चंद्रिका दीक्षित विवाहित असून तिला एक मुलगा आहे. जेव्हा तिच्या मुलाची प्रकृती बिघडली तेव्हा तिने एक रेस्टॉरंट मधील आपली नोकरी सोडून फूड स्टॉल सुरु करण्याचा निर्णय घेतला. चंद्रिकासाठी हे स्टार्टअप इतके खास नव्हतं. पण, एका फूड व्लॉगरने तिचा फूड स्टॉलचा व्हिडिओ व्हायरल केला.

अधिक वाचा –

रेस्टांरंट चेनमध्ये काम करण्याचा चंद्रिकाला फायदा

अचानक असंख्य लोक तिच्या फूड स्टॉलवर पोहोचले. गर्दी इतकी वाढली की, चंद्रिकासाठी इतके वडापाव उपलब्ध करून देणे कठीण जाऊ लागले. चंद्रिकाने फूड रेस्टॉरंटमध्ये काम केल्यामुळे तिला जेवणाची क्वालिटी आणि चवीचे महत्व माहित होतं. पुढे पुढे तिच्या व्यवसायाने गती धरली. काही काळानंतर चंद्रिकाकडे मस्टॅग कार असलेली दिसली.

अधिक वाचा –

सोशल मीडियारून व्हायरला झाली चंद्रिका दीक्षित 

चंद्रिका दीक्षितला सोशल मीडियाचा फायदा मिळाला. तिने इन्स्टाग्राम आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आपली उपस्थिती दर्शवली.चंद्रिका दीक्षितचे आज इन्स्टाग्रामवर ३ लाख ६२ हजार फॉलोअर्स आहेत. आता ती बिग बॉस ओटीटी ३ मध्ये पाऊल ठेवणार असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT