मनोरंजन

महेश भूपतिच्या ‘ब्रेक पॉइंट’ चे बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रदर्शित!

स्वालिया न. शिकलगार

मुंबई; पुढारी ऑनलाईन : महेश भूपतिच्या 'ब्रेक पॉइंट' चे बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रदर्शित झाले. सात भागांची ही मालिका त्यांच्या टेनिस मॅचेसच्या इतिहासावर आधारित आहे. इतकेच नाही तर 'ब्रेक पॉइंट' महेश आणि लिएंडर पेस या दोघांच्या नात्यावर देखील प्रकाश टाकेल.

टेनिस कोर्टवरील त्यांचे सर्वोत्तम खेळणे सर्वांचेच माहित आहे. झी 5 च्या ओरिजिनल सीरीजची निर्मिती प्रसिद्ध चित्रपट निर्माता अश्विनी अय्यर तिवारी आणि नितेश तिवारी यांनी केलीय. तिवारी यांनी दंगल, छिछोरे, बरेली की बर्फी आणि पंगा चित्रपटांचे काम केले आहे.

एका बाजूला याच्या पोस्टर्सनी प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. आता बहुप्रतिक्षित मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
टेनिस आयकॉन त्याच्या विभाजनाबद्दल स्पष्ट आणि प्रामाणिक असल्याची ही पहिलीच वेळ आहे. कथेमध्ये आपली बाजू मांडून अटकळांना पूर्णविराम देत आहेत.

ट्रेलरमध्ये टेनिस आयकॉन सानिया मिर्झा, बॉब ब्रायन, माइक ब्रायन आणि ली-हॅशची आयकॉनिक भागीदारी यासह कुटुंब आणि मित्रांचा समावेश आहे. ज्याने १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात भारतीय टेनिसला जगाच्या नकाशावर आणले.

लिएंडर पेस म्हणाला –

लिएंडर पेस म्हणतो की, "स्वतःला स्क्रीनवर पाहणे हा एक अनोखा अनुभव आहे. पण मला असे वाटते की बरेच काही सांगितले आणि अंदाज केले गेले आहेत. याला सरळपणे भिडणे, याला शांत करण्याचा यापेक्षा चांगला मार्ग असू शकत नाही. यासाठीच, पहिल्यांदाच आम्हाला आमची कथा सांगण्याची संधी मिळते आहे. आशा आहे की, प्रेक्षक आमच्या कोर्टातील भागीदारीची प्रशंसा करतील. ब्रेकअपच्या आमच्या कारणांचा आदर करतील. "

महेश भूपति म्हणाला-

महेश भूपति म्हणाला की, "प्रत्येक भागीदारी गोंधळ आणि उतार-चढावातून जाते, आमचीदेखील तशीच राहिली आहे. आमच्या ऑन-कोर्ट भागीदारीबद्दल जगाला माहिती आहे. या निमित्ताने त्यांना प्रथमच आमच्या ऑफ-कोर्ट जीवनाबद्दल आणि नातेसंबंधांबद्दल कळणार आहे. मात्र, यामुळे आमचा विजय आणि कामगिरी कमी ठरू नये. कारण आमच्यात मतभेद असूनही ली-हेशने इतिहास घडवला आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे "

सात भागांच्या या मालिकेचा प्रीमियर १ ऑक्टोबरला झी ५ वर होणार आहे. इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु या भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे.

हेही वाचलं का ? 

पाहा व्हिडिओ- BREAK POINT | Official Trailer | A ZEE5 Original | Premieres 1st Oct 2021 on ZEE5 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT