‘बॉर्डर-२’मधील ‘जाते हुए लम्हों’ हे गाणं रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं आहे.
Border 2 Song Jaate Hue Lamhon audio released
बॉलिवूडमधील बहुप्रतीक्षित युद्धपट ‘बॉर्डर-२’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटातील ‘जाते हुए लम्हों’ हे गाणं लॉन्च करण्यात आलं. गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. देशभक्ती, आठवणी आणि सैनिकांच्या भावना स्पर्शून जाणाऱ्या या गाण्यामुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
'बॉर्डर २'चे गाणे 'घर कब आओगे' थोड्या दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या चित्रपटाचे तिसरे गाणे 'जाते हुए लम्हों' देखील रिलीज करण्यात आले. ऑडियो व्हर्जन येताच फॅन्सनी गायक विशाल मिश्राचे खूपच कौतुक केले. विशाल मिश्राने या गाण्यात तडका लावला आहे. 'जाते हुए लम्हों' गाणे ऑडियो स्वरुपात रिलीज झाले.
हे गाणे 'बॉर्डर' मधील सर्वात आवडत्या गाण्यांपैकी एक होतं. दुसरीकडे ओरिजिनल गाण्याशी त्याची तुलना देखील केली जात आहे.
विशाल मिश्राने लिहिलं, 'तुमच्या समोर तुमचे गाणे म्हमणे आणि तुमचा आशीर्वाद मिळवणे माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. हे क्षण नेहमी माझ्यासोबत राहतील सर @रूप कुमार राठौड. #जाते हुए लम्होंचे आमचे व्हर्जन, मिथुन, मी आणि #Border2 ची संपूर्ण टीम, आपणास @Javedakhtarjadu सर आणि @The_AnuMalik जी यांना समर्पित...#JaateHueLamhon उद्या रिलीज होईल.'
सुनील शेट्टी दिसणार नाही 'या' चित्रपटात
सुनील शेट्टी बॉर्डर २ मध्ये दिसणार नाही , यावर प्रतिक्रिया देताना तो म्हणाला- 'बॉर्डरमध्ये डेथ सीन मिळाला होता. तेव्ही मी खुश होतो की, देशासाठी बलिदान देत आहे. लेकिन पहिल्यांदा मला असे वाटले की, चित्रपटाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहिलं तर माझी भूमिका जीवंत असती तर मी बॉर्डर २ मध्ये नक्कीच काम केलं असतं. युनिफॉर्म घालण्याची जी तडप आहे, ती मला नेहमीच राहिली आहे.'
बॉर्डर २ ची टीम कारवार नेवल बेस येथे जाणार?
एका इंग्लिश वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, बॉर्डर २ ची टीम बुधवारी, १४ जानेवारी रोजी कर्नाटकच्या कारवार नेवल बेस जाणार आहे. INS विक्रांत कारण आयएनएस विक्रांत - भारतीय युद्धनौका याच तळावर तैनात आहे. चित्रपटाचे कलाकार आणि क्रू भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांची आणि खलाशांची भेट घेतील शिवाय चित्रपटाची टीम विशेष श्रद्धांजली वाहणार आहे.
अहान शेट्टी या चित्रपटात एका धाडसी नौदल अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. याआधी 'घर कब आओगे' हे गाणे २ जानेवारीला जैसलमेरजवळील लोंगेवाला-तनोत येथे लष्करी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत रिलीज करण्यात आले होते. '
हे आहेत कलाकार
'बॉर्डर २' मध्ये सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या भूमिका आहेत. निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, जे. पी. दत्ता, आणि निधी दत्ता यांनी केली असून दिग्दर्शन अनुराग सिंग यांनी केले आहे. हा चित्रपट २३ जानेवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.