

ऋतिक रोशनने आपला वाढदिवस यावेळी अगदी हटके पद्धतीने साजरा केला असून तो सबा आजादसोबत यॉटवर एन्जॉय करताना दिसत आहे. ब्ल्यू थीम, फ्रेंड्स पार्टी आणि लव्हबर्ड मोमेंट्समुळे त्याचे बर्थडे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
Hritik Roshan Birthday with saba azad and friends Photos viral
बॉलीवुड स्टार ऋतिक रोशन ५२ वर्षांचा झाला. त्याने एक खासगी सेलिब्रेशन केलं. ज्यामध्ये तिची गर्लफ्रेंड सबा आजाद, मित्र परिवार आणि एक्स वाईइ सुदैन खानदेखी होती. एका यॉटवर ही पार्टी होती. मुंबईच्या किनारी यॉटवर सुज़ैन खानचा पार्टनर अर्स्लान गोनी, मुले हरेहान, हृदान देखील होते.
ऋतिकने पोस्टमध्ये लिहिलं-
''धन्यवाद माझे परिवार. माझे मित्र, माझे फॅन्स... त्या सर्वांना ज्यांनी मला मेसेज केले, माझ्यासाठी लिहिलं, पोस्ट केली, मला कॉल करण्याचा प्रयत्न केला ...पण बोलणे होऊ शकले नाही. त्या सर्वांनी काल आपल्या प्रार्थनेत माझ्यासाठी चांगले शब्द उच्चारले, मला एका क्षणासाठी आठवण केलं, काही वेळ माझ्याबद्दल विचार केला...त्या सर्वांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. या धरतीवर आपल्या सर्वासोबत एकाच जागी जीवंत राहणे माझ्यासाठी मोठी भाग्याची आणि सन्मानाची बाब आहे, आपण सर्वजण अवकाशात फिरत आहोत, ...ही आटवण नेहमी राहील..धन्यवाद. ११ जानेवारी २०२६.''
फोटोंमध्ये सुंदर यॉटमध्ये आरामदायी वातावरणात सर्वजण दिसले. ऋतिकच्या चेहऱ्यावर हास्य आणि त्याच्या शेजरी सबा दिसते. त्याची मुले आणि मित्रमंडळीदेखीस हसताना दिसताहेत. ही एक खासगी पार्टी होती.
सबाने रोशनला आपल्या वाढदिसाच्या शुभेच्छा देताना फोटोंजी एक सीरीज शेअर केली. आपल्या मेसेजमध्ये मेसेजमध्ये लिहिलं, "तुला आनंदी पाहून मला जगात जितके आनंद मिळत नाही तितके दुसरे काहीही नाही. वर्षाच्या सर्वोत्तम दिवशी, मी तुला आनंद आणि शांतीचे दिवस, समाधानकारक कामाने भरलेले, तुझ्या प्रतिभेला साजेसे काम, विचार करायला लावणारी पुस्तके, मित्र आणि कुटुंबासोबत वेळ आणि शांती... शाश्वत शांतीच्या शुभेच्छा देते. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी तुझ्यावर @hrithikroshan खूप प्रेम करते."
ऋतिक रोशनचा शेवटचा मोठा चित्रपट 'वॉर २' (२०२५) होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केले होते. आता तो नव्या चित्रपटांवर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.