अक्षय कुमारला पाहून ती ढसाढसा रडू लागली, तो म्हणाला.. रडायचं नाही, “माझ्यासोबत डान्स करशील?” file photo
मनोरंजन

अक्षय कुमारला पाहून ती ढसाढसा रडू लागली, तो म्हणाला.. रडायचं नाही, “माझ्यासोबत डान्स करशील?”

अभिनेता Akshay Kumar सध्या आपल्या आगामी ‘भूत बंगला’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत.

पुढारी वृत्तसेवा

bollywoodfan moved to tears during a surprise celebrity meet with bhooth bangla movie actor akshay kumar video viral

पुढारी ऑनलाईन :

अभिनेता Akshay Kumar सध्या आपल्या आगामी ‘भूत बंगला’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. याच दरम्यान त्याची एका महिला चाहत्याशी भेट झाली. आवडता अभिनेता समोर पाहताच ती महिला चाहती अक्षरशः भावूक होऊन रडू लागली. आपल्या चाहतीला रडताना पाहून अक्षयने जवळ घेत रडणे थांबवायला सांगितले.

चित्रपटसृष्टीतील कलाकारांबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड आकर्षण आणि वेड पाहायला मिळते. अनेक जण आपल्या आवडत्या स्टारला भेटण्याचं स्वप्न पाहतात. आणि अचानक जर तो स्टार समोर आला, तर आनंदाला पारावर राहत नाही. कधी कधी हा आनंद भावुकतेच्या रूपातही व्यक्त होतो. असंच काहीसं नुकतंच अक्षय कुमार यांच्या एका महिला चाहत्यासोबत घडलं.

(व्हिडिओ - viralbhayani इंन्स्टावरून साभार)

अक्षय कुमारच्या मिठीत रडू लागली चाहती

अक्षय कुमार यांचे चाहते जगभरात आहेत. काही चाहते त्यांना भेटण्यासाठी लांबचा प्रवास करून मुंबईत येतात, तर काहीजण त्यांच्याकडे मदतीची अपेक्षा करतात. दरम्यान, एका महिला चाहतीला तिचा आवडता अभिनेता अचानक समोर दिसताच ती भावूक होऊन रडू लागली. ही भेट तिच्यासाठी पूर्णपणे सरप्राइज होती आणि क्षणभर तिला विश्वासच बसला नाही की तिच्यासमोर अक्षय कुमार उभे आहेत.

चाहतीसोबत केला डान्स

भावूक झालेल्या चाहतीला शांत करत अक्षय कुमार म्हणाले, “रडायचं नाही.” त्यानंतर त्यांनी तिला विचारलं, “तू माझ्यासोबत डान्स करशील का?” चाहतीने होकार दिल्यानंतर अक्षय कुमार यांनी तिच्यासोबत डान्स केला. आपल्या आवडत्या अभिनेत्यासोबत डान्स केल्यानंतर ती चाहती आनंदाने हसताना दिसली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

‘भूत बंगला’ कधी रिलीज होणार?

अक्षय कुमार यांच्या ‘भूत बंगला’ या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर हा हॉरर-कॉमेडी चित्रपट १७ एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन Priyadarshan यांनी केलं आहे. तसेच यात Wamiqa Gabbi, Rajpal Yadav, Tabu आणि Mithun Chakraborty यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT