bollywood this south actress to play mandodari role in ranbir kapoor ramayana movie
पुढारी ऑनलाईन :
नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली 'रामायण' हा पौराणिक चित्रपट बनवला जात आहे. रणबीर कपूर स्टारर या चित्रपटात बॉलिवूडपासून दक्षिणेतल्या चित्रपटातील अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात दिसून येणार आहेत. आता या चित्रपटात एका सुंदरीची एंट्री झाली आहे पाहूयात कोण आहे ती सुंदरी...
ही अभिनेत्री दक्षिणेतली प्रसिद्ध अदाकारा आहे. तीने बॉलिवूडमध्येही काम केले आहे. ती रामायण सिनेमात मंदोदरीची भूमिका साकारणार आहे. मंदोदरी ही रावणाची पत्नी आहे. एका बॉलिवूड सुपरस्टारच्या सिनेमातही दिसून आली होती.
तुम्हला अजुनही लक्षात आले नसेल तर, या चित्रपटात काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) ही काम करणार आहे. सिकंदर मध्ये दिसलेल्या काजलला नितेश तिवारीने रामायणमध्ये मंदोदरीची भूमिकेसाठी घेतले आहे. तीचा लूक टेस्टही पूर्ण झाला आहे.
काजल अग्रवालने गेल्या आठवड्यातच आपला लुक टेस्ट दिला होता. ती मंदोदरीच्या भूमिकेत एकदम फिट बसत असल्याचे बालले जात आहे. इतकच नाही तर तीने आता चित्रपटाच्या चित्रिकरणालाही सुरूवात केली आहे. निर्मात्यांकडून सध्या रावणाच्या लंकेचे चित्रिकरण सुरू आहे. याआधी काजलला सलमान खानच्या सिकंदर चित्रपटात पाहण्यात आले होते.
या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी करत आहेत, तर निर्मिती नमित मल्होत्रा करत आहेत. यश या चित्रपटाचा सह-निर्माता देखील आहे. भगवान रामाची भूमिका रणबीर कपूर साकारत आहे आणि सीतेची भूमिका साई पल्लवी साकारत आहे. तर, सनी देओल भगवान हनुमानाच्या भूमिकेत आणि यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
रामायण दोन भागात प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग दिवाळी २०२६ ला प्रदर्शित होईल आणि दुसरा भाग दिवाळी २०२७ ला थिएटरमध्ये दाखल होईल. वृत्तानुसार, पहिल्या भागाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. आता दुसऱ्या भागाचे चित्रीकरण सुरू आहे.