IPL नंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार प्रिती झिंटा, शाहरुख-सलमान नाही, 'यांची' होती चाहती file photo
मनोरंजन

IPL नंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार प्रिती झिंटा, शाहरुख-सलमान नाही, 'यांची' होती चाहती

Preity Zinta हिने बॉलिवूडमध्ये आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर क्रिकेटच्या दुनियेशी नाते जोडले.

पुढारी वृत्तसेवा

bollywood preity zinta back to film in this year says dara singh is her favorite actor

पुढारी ऑनलाईन :

Preity Zinta हिने बॉलिवूडमध्ये आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर क्रिकेटच्या दुनियेशी नाते जोडले. Punjab Kings या संघाची मालकीण असलेली प्रिती झिंटा आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. अलीकडेच तिने सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रश्नांना मजेदार उत्तरे दिली.

प्रिती झिंटा सध्या चित्रपटांपेक्षा क्रिकेटमध्ये अधिक सक्रिय आहे. आयपीएलमध्ये ती पंजाब किंग्स संघाची मालकीण असून आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी ती वारंवार सामन्यांमध्ये दिसते. अलीकडेच तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. चाहत्यांना मोकळेपणाने प्रश्न विचारायला सांगत तिने त्यांची उत्तरेही दिली. यावेळी तिने आपल्या आगामी चित्रपटांबद्दल आणि आवडत्या अभिनेत्याबद्दलही सांगितले.

दोन चित्रपटांत दिसणार प्रिती झिंटा

एका चाहत्याने तिला विचारले की क्रिकेट आणि चित्रपट यांपैकी एक निवडायची वेळ आली तर ती काय निवडेल? यावर ती म्हाणाली, “मी १८ वर्षांपूर्वी क्रिकेट निवडले होते. यंदा मी दोन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. मी Sunny Deol यांच्यासोबत एक चित्रपट करत आहे. हा चित्रपट १३ ऑगस्ट २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.”

फेव्हरेट अभिनेता ऐकून चाहते चकित

एका चाहत्याने त्यांचा आवडता अभिनेता कोण, असा प्रश्न विचारला. त्यावर प्रिती झिंटा म्हणाली, “मी ‘फर्ज’ चित्रपटाच्या सेटवर Dara Singh यांना पाहिले होते. मी त्यांच्याकडे पाहतच राहिले. माझी आजी आम्हाला लहानपणी रामायण दाखवायची. नंतर मला कळले की हनुमानाची भूमिका दारा सिंह यांनी साकारली होती. तेच माझे आवडते अभिनेते आहेत.”

‘धुरंधर’ चित्रपटाची प्रशंसा

जेव्हा एका चाहत्याने सध्याचा कोणता चित्रपट आवडला असे विचारले, तेव्हा प्रिती झिंटाने ‘धुरंधर’ चित्रपटाचे नाव घेतले आणि त्याला ५ स्टार दिले. या निमित्ताने ती Ranveer Singh च्या चित्रपटाच्या चाहत्यांमध्ये सामील झाली असे म्हणावे लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT