बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार भक्तीत तल्लीन झालेले दिसले. सध्या अनन्या पांडेपासून भूमी पेडणेकरपर्यंत अनेक बॉलिवूड सेलेब्रिटींनी मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले. त्यांचे साधे आणि श्रद्धा-भक्तीत रमलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ग्लॅमरच्या दुनियेत असूनही कलाकारांची ही अध्यात्मिक बाजू विशेष ठरत आहे.
अनन्या पांड्ये
अनन्या पांड्येने भगवान शंकराचा आशीर्वाद घेतला. तिने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत. एक व्हिडिओदेखील तिने शेअर केला आहे.
भूमी पेडणेकर
'दलदल'च्या रिलीज दिवशी भूमी पेडनेकर स्वर्ण मंदिराचे दर्शन घेतले.
दुसऱ्या फोटोत लॅपटॉपवर आपली सीरीज पाहताना भूमी दिसली. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिहिलं- ''सहनशीलता, आभार.. गेल्या वर्षी मला स्वतःसोबत वेळ घालवायला मिळाले. शंकांसोबत. शांततेसोबत. ज्या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे अजून नव्हती, त्या प्रश्नांसोबत.त्याने मला भीती विसरायला लावले आणि हळूहळू, अलगदपणे, स्वतःवर पुन्हा प्रेम करायला शिकवले...कामावरील अढळ श्रद्धेमध्ये, मी पुढे जात राहिले. कारण मी निर्भय होते म्हणून नाही, तर माझा अजूनही विश्वास होता म्हणून. 'दलदल'ची निर्मिती त्याच भावनेतून झाली आहे. आज, मी हे काम कृतज्ञता, नम्रता आणि खुल्या मनाने तुमच्यासमोर सादर करत आहे. प्रेमासाठी तयार. शिकण्यासाठी तयार. पुढे जे काही येईल त्यासाठी तयार...''
अनुपम खेर
दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांनी वाराणसी येथे जाऊन काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटमध्ये लिहिलं-वाराणसीत सकाळी संकट मोचन बजरंग बली, काशी विश्वनाथ मंदिरात महादेवचे दर्शन घेतले.
अभिनेत्री शहनाज गिलने भावासोबत धन धन बाबा दीप सिंह जी गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतले आणि दोघांनी हातथ जोडत आशीर्वाद मागितला.